पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रयत्न झालेला आहे. या संदर्भलेखनात पुढीलप्रमाणे शिस्त पाळण्यात आलेली आहे: लेखकाचे नाव, संपादक असल्यास तसा उल्लेख; 'साहित्यकृतीचे नाव', साहित्यकृतीचा प्रकार; प्रकाशक, प्रकाशनस्थळ; आवृत्ती, प्रकाशनवर्ष, जर नोंद लेखकाने मासिकातील आणि नियतकालिकातील लेखांचा आपल्या लेखनासाठी संदर्भ म्हणून उपयोग केला असेल तर संदर्भलेखनात पुढीलप्रमाणे शिस्त पाळण्यात आलेली आहे: 'मासिकाचे अथवा नियतकालिकाचे नाव'; प्रकाशन महिना व वर्ष. हाती आलेल्या अपुऱ्या माहितीमुळे अपवादाने काही ठिकाणी सदरची शिस्त पाळता आलेली नाही, हे वाचकांनी ध्यानात घ्यावे. ज्या ठिकाणी नामोल्लेख नोंद घेण्यात आलेली आहे. तेथे दोन प्रकार संभवतात: १. जर त्या व्यक्तीची अन्य खंडात मुख्य चरित्रनोद दिलेली असेल तर तर्जनी चिन्हाचा उपयोग करून तेथे 'मुख्य चरित्रनोंद समाजकारण खंड, पत्रकारिता खंड' आदी नमूद करण्यात आलेले आहे. २. जर त्या व्यक्तीची नोंद याच खंडात अन्यत्र वेगळ्या नावाने दिलेली असेल, तर तर्जनी चिन्हाचा उपयोग करून ज्या नावाने ती नोंद आढळेल ते नाव देण्यात आले आहे. चरित्रनायक वर्गीकरण हा विषयाधारित कोश असल्यामुळे यात चरित्रनायकांचा त्यांच्या साहित्यविषयक निकषावर समावेश करण्यात आलेला आहे. तसे पाहता नाट्यलेखन हा साहित्यप्रकारच; पण नाटक खंड हा वेगळा होणार असल्यामुळे वाचकांच्या सोयीसाठी ज्या चरित्रनायकांची नाटककार अशी प्रकर्षाने ओळख आहे त्या सर्वांची मुख्य चरित्रनोंद नाटक खंडात घेण्यात आलेली असून प्रस्तुत खंडात त्यांचे नाव नमूद करून तेथे नामोल्लेख नोंद घेण्यात आलेली आहे. अर्थात यालाही काही अपवाद आहेत. काही व्यक्तींनी नाटकासोबत अन्य साहित्यप्रकारही समर्थपणे हाताळले आहेत. त्यामुळे त्यामुळे त्यांची नोंद साहित्यखंडांत येणे अपरिहार्य मानून ती प्रस्तुत खंडात देऊनच नाटक खंडात त्यांची नामोल्लेख नोंद समाविष्ट केलेली आहे. हेच सूत्र ढोबळपणे वापरून पत्रकार, विचारवंत, इतिहास संशोधक, भाषापंडित, भाषावैज्ञानिक, भाषाशास्त्रज्ञ, कोशकार, मुद्रक, प्रकाशक, संपादक या वर्गातील चरित्रनायकांचा विचार करण्यात आलेला आहे. तसाच एक अपवाद म्हणजे काही चरित्रनायकांचे साहित्यविषयक थोडेबहुत योगदान असले तरीही त्यांची नोंद अन्य क्षेत्रातील शिल्पकार म्हणूनच प्रकर्षाने आहे अशांची शून्य नोंद येथे घेण्यात आलेली नाही. हा प्रकल्प विषयाधारित असल्याने खंडाचा विषय ध्यानात घेऊन चरित्रनोंदी पाहणे अपेक्षित आहे. एक अपवाद म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची टिपणनोंद या खंडात समाविष्ट केलेली आहे. डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेतून आंबेडकरी साहित्य चळवळीचा एक प्रवाह मराठी साहित्यात निर्माण झालेला आहे त्या विचाराची पार्श्वभूमी स्पष्ट व्हावी म्हणून हा अपवाद केलेला आहे. अकारविल्हे चरित्रकोशातील वर्णमाला, सर्व नावांचा अकारविल्हे स्वरानंतर व्यंजने असा पुढीलप्रमाणे असेल: अ अ आ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ (-) अनुस्वार (:) विसर्ग शिल्पकार चरित्रकोश साहित्य खंड / नऊ