पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क ख ग घ ङ च छ ज झ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ काही व्यक्तीचे नाव अथवा आडनाव हे दोन प्रकारे लिहिले जाते. उदाहरणार्थ वा. रा. कान्त आणि वा. रा. कांत, वि. रा. करन्दीकर आणि वि. रा. करंदीकर. त्यामुळे त्यांची दोन्ही आडनावे समाविष्ट करून एका ठिकाणी नामोल्लेख नोंद तर दुसऱ्या ठिकाणी पूर्ण चरित्रनोंद दिलेली आहे. अर्थात हा अपवाद आहे, हे सूत्र नव्हे म्हणून अन्य ठिकाणी ही कसरत टाळली आहे. कोशात 'अ-ओ' असा स्वरांचा एक विभाग केलेला आहे व पुढे क, ख, ग... असे व्यंजनानुसार विभाग केलेले आहेत. ज्या अक्षराखाली एकही नोंद नाही, ते अक्षर वगळले आहे. वाचकांच्या सोयीसाठी कोशात अनुक्रमणिकेचाही अंतर्भाव केलेला आहे. अनुक्रमणिका अनुक्रमणिकेची रचना पुढीलप्रमाणे आहे. यात चरित्रनोंदीला अनुक्रमांक न देता पहिल्या स्तंभात चरित्रनायकाचे नाव दिले आहे. या नावाच्या आधी मुख्य चरित्रनोंदीसाठी , नामोल्लेख नोंदीसाठी '०', टिपणनोंदीसाठी अशा खुणा देण्यात आलेल्या आहेत. चरित्रनायकाच्या नावानंतरच्या स्तंभात या नोंदींचे पृष्ठक्रमांक दिलेले आहेत. या अनुक्रमणिकेतील शेवटचा स्तंभ 'मुख्य नोंद' असा आहे. पृष्ठक्रमांकावर जर नामोल्लेख नोंद असेल व त्या चरित्रनायकाची मुख्य नोंद याच खंडात जेथे असेल तो पृष्ठक्रमांक या स्तंभात दर्शविलेला आहे व त्या चरित्रनायकाची मुख्य नोंद अन्य खंडात असेल तर त्या विशिष्ट खंडाचे नाव या स्तंभात दर्शविले आहे. याआधीचा 'चरित्रनायकाने हाताळलेले साहित्यप्रकार' असा एक मोठा स्तंभ आहे. या स्तंभाचे अनुक्रमे काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा व ललित असे पाच उपविभाग पाडलेले आहेत. ज्यांना या दोन शतकांतील कवींचा अभ्यास करावयाचा आहे, अथवा कादंबरीकारांचाच अभ्यास करावयाचा आहे अशा वर्गीकरणाचा वाचकांना विशेष उपयोग असा होऊ शकतो. ते अनुक्रमणिका वाचून अभ्यासासाठी वाचनार्थ निवड करू शकतात. या उपप्रकारांव्यतिरिक्त अन्य प्रकारे जर चरित्रनायकांनी आपले साहित्यिक कार्य केले असेल तर त्यांच्या कार्याचे स्वरूप अथवा त्यांचा तो विशिष्ट साहित्यप्रकार त्यापुढच्या सहाव्या उपविभाग स्तंभात लिहिलेला आहे. कोशाबरोबर अनुक्रमणिकेची ही रचनाही वाचकांना उपयोगी ठरेल, असा विश्वास आहे. दहा / साहित्य खंड - दीपक हनुमंत जेवणे संपादन व निर्मितीप्रमुख शिल्पकार चरित्रकोश