पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/१४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ- साहित्य खंड गुरुजी, बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि अनेकानेक थोर मराठी संत यांचा अत्रे यांनी केलेला गुणगौरव म्हणजे विलोभनीय शब्दप्रभुत्वाचा सहजोद्रेक म्हणता येईल. पत्रकारिता हे अत्रे यांच्या कर्तृत्वाचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. याखेरीज संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्रे यांनी बजावलेली भूमिका तर केवळ अविस्मरणीय होय. संदर्भ: प्रा. डॉ. विलास खोले १. अत्रे प्र. के.; 'मी कसा झालो?'; परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई, ९वी आवृत्ती; १९९७. २. पै शिरीष देशपांडे मीना व अन्य, संपादक: आचार्य अत्रे- प्रतिभा आणि प्रतिमा; प्रेस्टीज प्रकाशन, पुणे; १९९७. अनंतफंदी मुख्य नोंद - लोककला खंड अनिल देशपांडे, आत्माराम रावजी कवी ११ सप्टेंबर १९०१ - ८ मे १९८२ मराठी कवितेच्या वाट- चालीमध्ये आणि अपारंपरिक शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान असणारे कवी 'अनिल' उपाख्य आत्माराम रावजी देशपांडे यांचा जन्म विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजा - पुरातील. अमरावती येथल्या तत्कालीन हिंदू हायस्कुलातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात दाखल झाले. वऱ्हाडात त्या काळातल्या पांढरपेशा समाजामध्ये शिक्षणासाठी पुण्याला फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेण्याची जणू चढाओढ असे. अनिलांनी मॅट्रिकची परीक्षा (१९१९) अलाहाबाद येथून शिल्पकार चरित्रकोश अनिल उत्तीर्ण केली होती. तत्त्वज्ञान हा विषय घेऊन पुण्याहून ते बी. ए. (१९२४) झाले. पुढे त्यांनी कायदे शिक्षणाचे धडे घेतले. मध्यंतरीच्या काळात कोलकाता येथील शांतिनिकेतनात नंदलाल बोस यांच्याकडे भारतीय चित्रकलेचा रीतसर अभ्यास केला. १९२५ साली एलएल. बी. झाले आणि त्यांनी अमरावतीला वकिली सुरू केली. यातूनच होशंगाबाद (मध्य प्रदेश) येथे सब- जज्ज म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली. कुसुमावती आणि कवी अनिल यांच्यामधील पत्रव्यवहार 'कुसुमानिल' पुस्तकात प्रसिद्ध झाला असून एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक म्हणून त्यास मराठी साहित्यात स्थान मिळाले आहे. १९३० साली त्यांच्या काव्यलेखनास प्रारंभ झाला. 'फुलवात' हा अनिलांचा पहिला कवितासंग्रह १९३२ साली प्रसिद्ध झाला आणि त्या वेळच्या समस्त मराठी साहित्यविश्वाचे लक्ष 'फुलवात'ने वेधून घेतले. त्या काळात 'रविकिरण मंडळा'तील कवींचा बोलबाला मराठीत विशेषत्वाने होता. पांडित्यपूर्ण, संस्कृतप्रचूर शब्दकळा, प्रसंगोत्पातता, शब्दालंकार, यमकादी बंधनांवर कठोर कटाक्ष यांचा त्यांच्या कवितेमध्ये भर असे. या पार्श्वभूमीवर 'हृदयीं लावियली फुलवात' अशा ओळी घेऊन अनिलांचा 'फुलवात' हा संग्रह बाहेर आला. साधी, सरळ व भावस्पर्शी रचना आणि उत्कट गीतात्मता हे या कवितेचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य ठरले. त्यानंतर तीनच वर्षांनी अनिलांची 'प्रेम आणि जीवन' ही मुक्तछंदातील कविता रसिकांपुढे आली.

पाठोपाठ १९४० साली अनिलांनी 'भग्नमूर्ती' हे आपले चिंतनात्मक खंडकाव्य (१९३५) रसिकांना सादर केले. त्यातून कला आणि संस्कृती यांवर अनिलांनी भाष्य केले आहे. महायुद्ध, भारताचा स्वातंत्र्यलढा, मार्क्सवादाचा पगडा आणि त्याने केलेली एकूणच समाजरचनेची नवी मांडणी, अशा सर्व उठावात्मक चळवळींचा हा काळ.

'भग्नमूर्ती' किंवा 'निर्वासित चिनी मुलास' (१९४३) ह्या रचनांमधून त्यांचे चिंतनात्मक पडसाद दिसून येतात. या रचनांसाठी अनिलांनी वापरलेल्या मुक्तछंदाने मराठी साहित्यविश्वात मोठेच वादळ निर्माण केले. 'मुक्तछंद my ३ औ