पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/१७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अ- औ

साहित्य खंड
आफळे, सुनीती जयंत
 

प्रमेय सिद्ध करणारी मराठीतील पहिलीच आत्मकथनात्मक कादंबरी आहे. या कादंबरीने हरिभाऊंना मराठी कादंबरी क्षेत्रात युगप्रवर्तकाचा मान मिळवून दिला.
 पाश्चात्त्य सामाजिक कादंबऱ्यांप्रमाणेच सर वॉल्टर स्कॉट, व्हिक्टर ह्यूगो, ड्यूमा व टॉलस्टॉय या लेखकांच्या कादंबऱ्या हरिभाऊंनी आवडीने वाचल्या होत्या. सर वॉल्टर स्कॉटच्या कादंबऱ्यांची त्यांनी अनेक पारायणे केली होती. शिवाय शिवाजी व शिवकाला यांसंबंधी उपलब्ध साधने, बखरींची इंग्रजीतील भाषांतरे, काव्येतिहास संग्रह, पोवाडे, म्हल्हारराव चिटणीस लिखित सप्तप्रकरणात्मक 'चरित्र' ही बखर आदींचे वाचन त्यांनी केले होते. महाराष्ट्राच्या इतिहासावरील साधने उपलब्ध नसतानाही हरिभाऊंनी दर्जेदार ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. कादंबऱ्या रंजक व्हाव्यात म्हणून त्यांनी काही कल्पित पात्रांचीही योजना केली. कादंबऱ्यांतून उत्कंठावर्धक कथानकांची मांडणी केली. विजयनगरच्या इतिहासावरील भरपूर साधने उपलब्ध नव्हती. तरीही 'वज्राघात' सारखी भाषावैभवाच्या दृष्टीने सरस असणारी; नाजुकपणा, कौशल्य, रेखीवपणा ही वैशिष्ट्ये असाणारी कादंबरी म्हणजे हरिभाऊंच्या प्रतिभाशक्तीची किमया आहे. हरिभाऊंच्या कादंबरीवर पाल्हाळिक, रसभंग करणारी, गोपनीयतेचा अतिरेक करणारी असे दोषारोप केले गेले हे दोष मान्य केले, तरी त्यांनी शब्दांकित केलेले सामाजिक आणि ऐतिहासिक जीवनाचे विविधरंगी रूप आजही चोखंदळ वाचकांना आकृष्ट करते.
 हरिभाऊंनी आपल्या ललित लेखनातून समाजप्रबोधनपर विचार मांडले. त्याप्रमाणे राजकीय- सामाजिक कार्यातही सक्रियतेने भाग घेतला. 'आनंदाश्रम' संस्थेद्वारे संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन केले. १९१२ साली अकोला येथे भरलेल्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'च्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मराठी माध्यमाचा आणि पदवी अभ्यासक्रमात मराठी विषयाच्या स्वीकृतीचा पुरस्कार केला तसेच विविध भाषांतील परिभाषिक शब्दकोशांचा आग्रह धरला.

- वि. शं. चौघुले

संदर्भ:

  1. अदवंत, म. ना; 'हरिभाऊ: विविधदर्शन'; स्कूल ॲन्ड कॉलेज बुक स्टॉल, कोल्हापूर; १९६४.
  2. भगारे, ल. म; 'हरिभाऊ'; स्कूल ॲन्ड कॉलेज बुक स्टॉल, कोल्हापूर, १९५६.
  3. पानसे, वेणूताई; 'हरि नारायण आपटे (चरित्र आणि वाङ्मय विवेचन); बालोद्यान प्रेस, पुणे; १९३१.



आफळे, श्याम मनोहर
⇒ श्याम मनोहर

आफळे, सुनीती जयंत
कथाकार
१२ एप्रिल १९४२

 सुनीती आफळे यांचा जन्म नाशिक येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षण एच. पी. टी. महाविद्यालय, नाशिक येथे झाले. बी. ए. ला व एम. ए. ला संस्कृत व अर्धमागधी हे विषय घेऊन त्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली.
 'आद्य शंकराचार्यांच्या भाषाशैलीची वैशिष्ट्ये' या विषयातील संशोधनासाठी नागपूर विद्यापीठाची 'डॉक्टरेट' प्राप्त झाली. 'ब्रह्मसूत्रशंकरभाष्य' या संशोधनासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाची 'फेलोशिप' मिळाली.
 बिटको चांडक महाविद्यालय, नाशिक रोड व सेन्ट जॉर्ज स्कूल, फरिदाबाद, हरियाणा येथे अध्यापन केले. त्याचप्रमाणे नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागात ८ वर्षे रिसर्च फेलो म्हणून त्यांनी काम केले.
 सुनीती यांनी कथा, कादंबरी, ललित लेखन तसेच वैचारिक व संशोधनात्मक लेखन केले आहे. बालवाङ्मय, काव्य आणि आकाशवाणीसाठी नभोनाट्य लेखनही केले आहे. 'कुंपणापलीकडील बकुळी बाभळी', 'अतिथी', 'रिकामी', 'अनाथ', 'केवडा', हे


शिल्पकार चरित्रकोश
२९