पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/२०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

क कर्वे, इरावती दिनकर स्त्रीस्वातंत्र्याची अभिव्यक्ती मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ साहित्य खंड इरावतींनी मानववंशशास्त्र व समाजशास्त्र यांमध्ये जे संशोधनपर काम आयुष्यभर केले, त्याचे लिखित पुनः स्वरूप म्हणजे त्यांची वेगवेगळी संशोधनपर पुस्तके होत. आधी संशोधन, मग त्या संशोधनाविषयी व्याख्याने व त्यानंतर त्याचे पुस्तकात रूपांतर हा क्रम दिसतो. निबंध, काही असंग्रहित लेख, 'मराठी लोकांची संस्कृती', 'आमची संस्कृती', 'संस्कृती', 'धर्म' ह्या पुस्तिका; अशी त्यांची धर्म व संस्कृतीविषयक पुस्तके आहेत. एक मानववंशशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ म्हणून तर हे लेखन विचार करण्यासारखे आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या विषयाबद्दल मनात असलेली खोल आस्था त्यांच्या लेखनातून सतत दिसते. त्यामुळे ते लेखन म्हणजे कोरडा संशोधनविषय न राहता एका हृदयशोधाचे रूप घेते. इरावतींच्या संस्कृतीविषयक लेखनाचा विचार वैचारिक वाङ्मय म्हणून तर करता येतोच, पण महाराष्ट्राच्या संस्कृतिविचारांची भावधारा संपन्न करणारे वाङ्मय म्हणूनही करता येतो. 'युगान्त' पुस्तकाला १९६७ साली एक दर्जेदार लेखक म्हणून ललित मासिकाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र सरकारचा व साहित्य अकादमीचा असे दोन्ही पुरस्कार त्यांना १९६७ साली मिळाले. एक ललितकृती म्हणून तर 'युगान्त' श्रेष्ठ आहेच. त्यातील व्यक्तिरेखा वास्तवाला न सोडताही विलोभनीय आहेत. त्याखेरीज ह्याव्यतिरिक्त अभ्यासाच्या आधारे लिहिलेले १०१ त्यातून घडवणारे इतिहास - दर्शन व समाजशास्त्रीय आकलन सामान्यांच्या ज्ञानात भर टाकणारे आहे. श्रेष्ठ टीका ही एक तऱ्हेची नवनिर्मिती असते, हे 'युगान्त' वाचल्यावर जाणवते. 'युगान्त' मधील स्त्री-पुरुष चित्रणे हे युगान्तचे वैभव आहे. इरावतींची मूल्यकल्पना, न्याय- अन्याय विचार, स्त्री-जातीचा कळवळा याचे दर्शन वाचकाला होते. व्यापक अनुभवविश्व, आत्मपरता, ललितलेखांना आत्मचरित्रात्मक मूल्य, स्त्री व स्त्रीविषयक प्रश्नांचा सतत अनुबंध, लेखनावर उदारमतवादाचा परिणाम ही इरावतींच्या लेखनाची वैशिष्ट्ये म्हणता येतील. “स्त्रियांची चळवळ ही काही स्वतंत्र चळवळ नाही. सामाजिक अन्यायाखाली दडपलेल्या बहुसंख्य मानवांच्या सुटकेसाठी जी चळवळ चालली आहे, त्याचाच एक भाग म्हणून त्याच्याकडे बघायला हवे. " अशी त्यांची व्यापक विचारसरणी होती. जातीविषयक अनेक जातीजमातींचे, आदिवासींचे अनुभव आणि जगप्रवासामुळे वैश्विक अनुभव इरावतींकडे जमा होते. इंग्लंड, अमेरिका बघून त्या हुरळल्या नाहीत. भारतीय संस्कृती, श्रद्धा यांचा डोळसपणे विचार करणाऱ्या त्या विदुषी होत्या. स्त्रीस्वातंत्र्याच्या भारतातील मर्यादा बघून त्या दुःखी होत. त्याच्या अत्यंत कडवट प्रतिक्रिया त्यांच्याकडून उमटत. बिहारमधील स्त्रियांबद्दल, तसेच "महाराष्ट्रात मुंडन केलेली विधवा म्हणजे एक जिवंत प्रेत वावरत असते.” अशा जागा हेच दर्शवितात. महानुभावीय पंथामध्ये मुलींना लहान वयातच संन्यास देतात; तसेच जैन समाजामध्ये मुलाच्या आठव्या, दहाव्या किंवा अकराव्या वर्षी त्याला साधूपणाची दीक्षा देतात; यांबद्दल इरावती नापसंती दर्शवतात. ६० 'हिंदू समाजरचना' (१९६४), 'हिंदू समाज : एक अन्वयार्थ' भाषांतर : Hindu Society: An Interpretation; Kinship Organization In India (1953) भाषांतर : भारतमे बंधुत्व संघटन; 'महाराष्ट्र : एक अभ्यास' भाषांतर : Maharashtra And Its People; ही इरावतींची वैचारिक व संशोधनपर पुस्तके आहेत. व्यक्ती, कुटुंब, समाज, प्रदेश व तेथील लोक यांबद्दलची ही पुस्तके आहेत. मानववंशशास्त्र हा त्यांचा आवडता विषय होता. इरावतींना ललितलेखिका म्हणून ओळखले जाण्यापेक्षा एक मानववंशशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणे हवे होते. नातेदारी संघटनेविषयीच्या (Kinship Organization In India) त्यांच्या पुस्तकाने त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. नातेवाचक शब्द स्पष्ट करताना इरावतींचा शब्दांचा व भाषेचा अभ्यास, त्या शिल्पकार चरित्रकोश