पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ल व श य ष र स कोशात स्वरांचा एक विभाग केलेला आहे व पुढे क, ख, ग... असे व्यंजनानुसार विभाग केलेले आहेत. ज्या अक्षराखाली एकही नोंद नाही ते अक्षर वगळले आहे. वाचकांच्या सोयीसाठी कोशात अनुक्रमणिकेचाही अंतर्भाव केलेला आहे. अनुक्रमणिका अनुक्रमणिकेची रचना पुढीलप्रमाणे आहे. यात चरित्रनोंदीला अनुक्रमांक न देता पहिल्या स्तंभात चरित्रनायकाचे नाव देण्यात आलेले आहे. या नावाच्या आधी मुख्य चरित्रनोंदीसाठी , नामोल्लेख नोंदीसाठी , टिपणनोंदीसाठी अशा खुणा देण्यात आलेल्या आहेत. चरित्रनायकाच्या नावानंतरच्या स्तंभात या नोंदींचे पृष्ठक्रमांक दिलेले आहेत. या अनुक्रमणिकेतील शेवटचा स्तंभ 'मुख्य नोंद' असा आहे. पृष्ठक्रमांकावर जर नामोल्लेख नोंद असेल व त्या चरित्रनायकाची मुख्य नोंद याच खंडात जेथे असेल तो पृष्ठक्रमांक या स्तंभात दर्शविलेला आहे व त्या चरित्रनायकाची मुख्य नोंद अन्य खंडात असेल तर त्या विशिष्ट खंडाचे नाव या स्तंभात दर्शविले आहे. या आधीचा चरित्रनायकाचे कार्यक्षेत्र असा एक मोठा स्तंभ आहे. विज्ञान व तंत्रज्ञान खंडात, या स्तंभाचे अनुक्रमे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, गणित असे पाच उपविभाग पाडले आहेत. आणि सहावा उपविभाग संकिर्ण असून त्यात विविध कार्यक्षेत्र समाविष्ट आहेत. ज्यांना केवळ भौतिकशास्त्रज्ञाचा अभ्यास करायचा आहे अथवा गणितींचा अभ्यास करावयाचा आहे चकाना या वर्गीकरणाचा विशेष उपयोग होऊ शकतो. चरित्रनायकांची संख्या लक्षात घेऊन हे उपविभाग पाडले आहेत. तसेच शिक्षण खंडात, चरित्रनायकाचे कार्यक्षेत्र या स्तंभाचे शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य; शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण प्रसारक, विचारवंत; संचालक, व्यवस्थापक, प्रशासक; संस्थापक आणि संकिर्ण असे पाच उपविभाग केले आहेत. या वर्गीकरणाचाही वाचकांना यथायोग्य उपयोग होईल असा विश्वास आहे. - दीपक हनुमंत जेवणे १२ / विज्ञान व तंत्रज्ञान खंड शिल्पकार चरित्रकोश