पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क काळे, शरद गंगाधर प्रशासन खंड अर्थशास्त्राची आणि गणिताची गोडी होती, पण विषयांची ही जोडी तेव्हा नव्हती. त्याच वेळी मनामध्ये ‘फळ्याशिवाय गणिते’ शिकवणार्‍या पं. गो.म. जोशी यांच्याबद्दल प्रचंड औत्सुक्य निर्माण होत गेल्याने त्यांनी गणित हा विषय निवडला. भविष्यातही शरद काळे यांच्यावर या निर्णयाचा प्रचंड प्रभाव असल्याचे जाणवते. गो.मं.कडून गणिताबरोबरच जीवनातले प्रश्नही स्वत:चे स्वत: सोडवायचे, चौकटीबाह्य विचार करायचा आणि पाठांतरापेक्षा ज्ञान आत्मसात करण्याचे बाळकडू त्यांना मिळाले. प्रशासकीय सेवेत याच गुणांचा त्यांना सर्वाधिक फायदा झाला. शरदरावांनी यथावकाश पुणे विद्यापीठातून गणितामधून एम.ए. पूर्ण केले, तेसुद्धा कुलगुरूंच्या सुवर्णपदकासह! हे वर्ष होते १९६२. पुन्हा एकदा गो.म. जोशींचेच मार्गदर्शन आणि आपल्या आईची इच्छा म्हणून त्यांनी भारतीय सनदी सेवेची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. १९६३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत, महाराष्ट्र केडरमध्ये ते दाखल झाले. आपल्या छत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीमध्ये त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. या दरम्यानच अमेरिकेच्या ईस्ट-वेस्ट सेंटरकडून मिळालेल्या पाठ्यवृत्तीवर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ हवाई येथून एम.बी.ए. पूर्ण केले. अर्थशास्त्राची आवड, जगातील अर्थव्यवस्थेची बदलती वाटचाल, प्रशासकीय अधिकार्‍यांकडे भविष्यात येऊ पाहणारी व्यवस्थापकीय गुणवत्तेची आव्हाने यांची दूरदृष्टीने जाणीव ठेवूनच काळे यांनी १९७२ मध्ये एम.बी.ए. पूर्ण केले. १९६४ - ६५ मध्ये पुण्याचे साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम बघितले. त्यानंतर त्यांनी फलटणचे प्रांताधिकारी, महाराष्ट्र राज्याच्या वित्तविभागाचे उपसचिव, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा महत्त्वपूर्ण पदांवर काम केले. अवघ्या पाच वर्षांच्या सेवेतील चमक, लोकाभिमुख आणि कार्यक्षम प्रशासन चालविण्याची पद्धती आणि सर्जनशीलता या गुणांमुळे वयाच्या तिसाव्या वर्षी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. चीनचे युद्ध, १९६५, १९७१ या वर्षांमधील भारत-पाक युद्धे अशा पार्श्वभूमीवर शरद काळे यांनी वित्त विभागामध्ये काम केले. पंचवार्षिक योजना, ‘प्लॅन्ड हॉलिडे’ या काळात त्यांनी वित्तक्षेत्राशी संबंधित महत्त्वाची पदे भूषविली. १९७२ ते १९७४ या काळात महाराष्ट्र राज्याच्या योजना विभागाचे उपसचिव म्हणून, त्यानंतर तत्कालीन केंद्रीय अर्थ आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह प्रतिनियुक्तीवर दिल्लीत वित्तयोजना विभागाचे संचालक म्हणून शरद काळे कार्यरत होते. हा आणीबाणीनंतरचा काळ होता. उत्तर भारतातील अनेक राज्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ‘ओव्हरड्राफ्ट’ घेत होती, त्याच वेळी दुसरीकडे समाजवादी प्रभावातून करपद्धती रद्द करण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे वित्तीय मागण्यांवरून केंद्र-राज्य संबंध ‘नाजूक’ झाले होते. योजनांवर काम करण्यार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांना या काळात प्रचंड तणावाखाली काम करावे लागत होते. राज्यसरकारकडून आलेल्या मागण्या, त्यांची व्यवहार्यता तपासणे, आर्थिक आणीबाणीची वारंवार होणारी मागणी, मध्यप्रदेश सरकारने प्रवेश कर आकारण्यासंदर्भात विधिमंडळामध्ये मंजूर केलेले विधेयक, ओव्हरड्राफ्टवर उपाय अशा अनेक प्रश्नांवर काळे एकाच वेळी लक्ष देत होते. त्यांचे वरिष्ठ आय.एच. कौल यांच्या मदतीने काळे यांनी ‘रेग्युलेशन ऑफ ओव्हरड्राफ्ट’ हा कायदा तयार केला आणि त्यामुळेच भारतीचे उपपंतप्रधान व गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विशेष सहकारी म्हणून काळे यांना बढती मिळाली. या सर्व काळात भारतीय घटनेच्या‘आशया’चा अनेकदा प्रश्न उपस्थित झाला १९२ शिल्पकार चरित्रकोश