पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग। गोखले, केतन कमलाकर प्रशासन खंड त्यामुळे आपण युद्धामध्ये कोणत्याही देशाची बाजू घेऊ शकत नव्हतो. भारत या देशांकडून दरवर्षी ३ दशलक्ष टन कच्चे तेल आयात करतो. युद्ध काळातही त्याचा पुरवठा सुरू राहावा यासाठी गोखले यांनी महत्त्वपूर्ण काम केले. १९८७ मध्ये अशोक गोखले यांची नियुक्ती दिल्ली येथे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव या पदी करण्यात आली. १९८७-८८ या एक वर्षाच्या काळात परराष्ट्र सेवा प्रशिक्षण संस्था दिल्लीचे प्रमुख म्हणून गोखले यांनी काम पाहिले. या संस्थेचा प्रशिक्षण कार्यक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला. ऑक्टोबर १९८८ मध्ये अशोक गोखले परराष्ट्र मंत्रालय सचिव या पदावरून निवृत्त झाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा निर्माण करण्यामध्ये गोखले यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. परराष्ट्र सेवेतील आपले अनुभव अशोक गोखले यांनी ‘इनसाइड थ्री मोनार्किज अँड सिक्स रिपब्लिक - मेमरिज ऑफ अ‍ॅन इंडियन डिप्लोमॅट’ या आत्मचरित्रात शब्दबद्ध केले आहेत. भारतीय परराष्ट्र सेवेचा इतिहास आणि तसेच त्या देशातील राजकीय परिस्थिती आणि भारताची भूमिका जाणून घेण्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज आहे. निवृत्तीनंतर १९८९ ते ९७ या काळात गोखले वरळी येथील हिंदुजा फाउण्डेशनचे अध्यक्ष होते. सध्या ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत. नागरिक चेतना मंच, नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटी अशा विविध सामाजिक उपक्रमांचे ते सदस्य आहेत. - संध्या लिमये

गोखले, केतन कमलाकर व्यवस्थापकीय संचालक - कोकण रेल्वे २१ जून १९४७ केतन कमलाकर गोखले यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे वडील केंद्र सरकारच्या रक्षालेखा विभागात (डिफेन्स अकाउंट सर्व्हिस) मध्ये नोकरीला होते. त्यांच्या आईचे नाव कालिंदी होते. नोकरीनिमित्त वडिलांच्या सातत्याने होणार्‍या बदल्यांमुळे त्यांचे शिक्षण विविध ठिकाणी झाले. त्यांचे तिसरीपर्यंतचे शिक्षण लखनऊ येथे हिंदी माध्यमात झाले. चौथी ते नववीपर्यंतचे शिक्षण अहमदनगरमधील दादा चौधरी विद्यालयात मराठी माध्यमात झाले. तर नववी व दहावीचे शिक्षण त्यांनी १९६० ते ६२ पर्यंत कैरो येथे केले. १९६३ ते ६५ या कालावधीत त्यांनी दिल्लीमधून रामजास महाविद्यालयात शिक्षण घेतले तर १९६४मध्ये पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बी.ई. पूर्ण केले. त्यानंतर वडाळा येथील वीर जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (पूर्वीचे व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट) मधून रचना अभियांत्रिकीमध्ये एम.ई. पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वाणिज्य शाखेतील व्यवस्थापन शास्त्रातून पीएच.डी. पूर्ण केले. त्यांनी १९७० मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि १९७१ मध्ये त्यांची भारतीय रेल्वे वाहतूक सेवेसाठी निवड झाली. रेल्वे स्टाफ कॉलेज, बडोदा येथील प्रशिक्षणानंतर त्यांची नियुक्ती साहाय्यक परिचालक अधीक्षक, माल वाहतूक या पदावर जबलपूर येथे करण्यात आली. भारतीय रेल्वे सेवेमध्ये केतन गोखले यांनी छत्तीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये कमर्शिअल, ऑपरेशन्स, सेफ्टी, जनरल मॅनेजमेंट संबंधातील महत्त्वाच्या पदांवर काम केले. जून १९८२ ते १९८६ या कालावधीत गोखले वडोदरा येथील ‘रेल्वे स्टाफ कॉलेज’मध्ये ऑपरेशन आणि रिसर्च त्याचबरोबर कमर्शियल मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयासाठी वरिष्ठ व्यवस्थापक पदावरील २१८ शिल्पकार चरित्रकोश