पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| मात्र लेखकांची कमतरता वे लष्करी अधिका-यांच्या वा त्यांच्या नातेवाईकांच्या राहत्या घरांचे अपुरे पन्ने ह्या दोन अडचणी ह्या टप्प्यात प्रकर्षाने जाणवल्या. काही मराठी लष्करी अधिकारी महाराष्ट्राबाहेर स्थायिक झाल्याने त्यांच्यापर्यंत पोचणे थोडे अवघड गेले. जणांचा वारंवार पाठपुरावा करुनही काही अडचणींमुळे ग्रंथ छपाईला जाईपर्यंत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. अशा चरित्रनायकांची यादी परिशिष्टात दिली आहे. जर वाचकांच्या सहकार्याने यांची महिती मिळू शकली तर पुढच्या आवृत्तीत त्यांचा समावेश करता येईल. | या सगळ्या प्रक्रियेमध्ये संरक्षण खंडाच्या सल्लागार समितीतील सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले या सर्वांची मी व्यक्तीशः आभारी आहेत. अविनाश पंडीत, वर्षा जोशी, राजेश प्रभु यांनी सर्व नोदींचे संपादन केले व वेळप्रसंगी त्यातल्या अनेक नोदींचे पुर्नलेखनही केले. या खंडाचे दोन भाग केले आहेत. यामधे सुरुवातीला मुख्य चरित्रनायकांच्या नोंदी असून त्यानंतर वीरचक्रप्राप्त सैन्यातील अधिकारी व सैनिकांची भाषांतरित संक्षिप्त माहिती दिली आहे. | महाराष्ट्र हा लढवय्यांचा देश आहे. अनेक वीरांनी कायमच आपल्या अतुलनीय शौर्य धैर्य वीर्याचे दर्शन भारताला घडवले. या संरक्षण खंडाच्या माध्यमातून या सर्व वीरांना व सैनिकीकरणाची उर्मी समाजात जागवणाच्या अनेक धुरीणांना सलाम केला आहे तसेच उगवत्या तरुणाईपुढे त्यांचा आदर्श शब्दांतुन मांडण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. संरक्षण क्षेत्रातले महाराष्ट्राचे योगदान इतके प्रचंड आहे की काहीतर संपूर्ण गावेच्या गावे या समर्पणाच्या भावनेतून गेली अनेक वर्षे भारतमातेला गावातल्या पिढ्यान् पिढ्या अर्पण करत आहेत. या सगळ्यांचा नामोल्लेख खंडात करणे केवळ अशक्य असल्याने खंडात नक्कीच त्रुटी राहणे शक्य आहे. वाचक त्याबद्दल उदार अंत:करणाने क्षमा करतील असा विश्वास आहे. - रुपाली गोवंडे खंड समन्वयक ३८६ शिल्पकार चरित्रकोश