पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पित्रे, शशिकांत गिरिधर संरक्षण खंड देशाच्या सुरक्षेसाठी लढणार्‍या जवानांना तयार करणारे प्रशिक्षक/मार्गदर्शक म्हणून त्यांनी विविध ठिकाणी काम पाहिले. यात दि.२३ डिसेंबर १९६३ ते दि.१० ऑगस्ट १९६५ या कालावधीत वेलिंग्टन इथे लेफ्टनंट कर्नल पदावरून ‘अ’ वर्ग प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले. एप्रिल १९६७ ते १९६९ या काळात ब्रिगेड कमांडर म्हणूनही त्यांनी काम केले. दि.२६ मे १९६९ ते दि.१४ एप्रिल १९७१ दरम्यान सैन्यात ब्रिगेडियर असताना त्यांनी वेलिंग्टन डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे प्रमुख प्रशिक्षकपद निभावले. १९७१पासून डिव्हिजनल कमांडर असताना लेफ्टनंट जनरल पिंटो यांनी भारत-पाक युद्धात मोलाचे योगदान दिले. त्याकरिता त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. एप्रिल १९७१ ते जानेवारी १९७४ या कालावधीत मेजर जनरल असताना डिव्हिजनल कमांडर, ९जानेवारी १९७४ ते नोव्हेंबर १९७६ दरम्यान सैन्य मुख्यालयात सैनिकी प्रशिक्षणाचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. नोव्हेंबर १९७६ ते जानेवारी १९७९ दरम्यान लेफ्टनंट जनरल असताना कॉर्प्स कमांडर, जानेवारी १९७९ ते दि.३० जून १९८० या काळात त्यांनी दिल्लीत नॅशनल डिफेन्स कॉलेजचे कमांडंट म्हणून काम केले. या पदावर असताना त्यांनी सेनेला तसेच पोलीस दलातल्या अधिकार्‍यांना सैनिकी प्रशासन, आंतरराष्ट्रीय संबंध, संरक्षण आणि आर्थिक-सामाजिक बाजू या संदर्भांतील प्रशिक्षण दिले. दि.१ जुलै १९८० ते दि.३० जून १९८२ या दरम्यान लेफ्टनंट जनरल असताना भूसेनेच्या मध्य विभागाचे प्रमुख (‘जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ’) अशी पदे पिंटो यांनी भूषवली. १९८०नंतरच्या कालावधीत उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा आणि मध्यप्रदेश ह्या भागांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. राजपूत रेजिमेंटमध्ये दि.२ ऑगस्ट १९७३ ते दि.३० जून १९८२ या काळात ते कर्नलपदी रुजू होते. १९७४ ते १९७६ या काळात पिंटो क्रीडा नियामक मंडळात अध्यक्षपदी होते, तर याच कालावधीत ते भारतीय हॉकी फेडरेशनचे उपाध्यक्ष होते. यावरून त्यांची क्रीडा आणि प्रशासनातली आवडही दिसून येते. - पल्लवी गाडगीळ

पित्रे शशिकांत गिरिधर भूसेना - मेजर जनरल राष्ट्रीयसुरक्षाविषयकजनजागृती,भूसुरुंगविषयककार्य १२ एप्रिल १९४२ शशिकांत गिरिधर पित्रे यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील आयकर खात्यात अधिकारी होते. तर आई सुशीला गृहिणी होती. डॉ.दादासाहेब भडकमकर हे त्यांचे मामा तर करवीरपीठाचे तत्कालीन पू.शंकराचार्य हे त्यांचे आजोबा होते. शशिकांत हे सहा भावंडांतील धाकटे पुत्र होते. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये आणि नंतर सातार्‍याच्या न्यूइंग्लिशस्कूलमध्ये झाले. पुण्यातील सर परशुरामभाऊ (स.प.) महाविद्यालयातून त्यांनी सांख्यिकी या विषयातील पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. महाविद्यालयात असताना ते राष्ट्रीय छात्रसेनेच्या अधिकारी प्रशिक्षण विभागात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी भारतीय सैन्य प्रबोधिनीमध्ये एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. १९६२ मध्ये त्यांनी भूसेनेच्या अभियांत्रिकी विभागात (कोअर ऑफ इंजिनिअर्स) प्रवेश केला. पुण्यातील सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सी.एम.इ.) त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. १९६५च्या भारत-पाक युद्धात ते सहभागी होते. १९७१च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी ते नवव्या ४६६ शिल्पकार चरित्रकोश प