पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वालकर, शंकर शंखपान संरक्षण खंड व । वालकर, शंकर शंखपान भूसेना - कॅप्टन महावीरचक्र ८ मार्च १९४३ - १७ डिसेंबर १९७१ शंकर शंखपान वालकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील केडगाव येथे झाला. वालकर कुटुंब हे मूळचे बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील होत. १५ जून १९६९ रोजी शंकर वालकर हे भूसेनेत कॅप्टन म्हणून भरती झाले. मद्रास रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारताच्या पश्चिम भागाच्या संरक्षणाची जबाबदारी वालकर यांच्या रेजिमेंटवर सोपविण्यात आली होती. वालकर व त्यांची बटालियन हिंगोरी भागात पोहोचली. तिथून पुढचे ४२ मैलांचे अंतर कापतानाच शत्रूच्या जोरदार गोळीबाराचे त्यांना सामोरे जावे लागले. आपल्या प्राणाची पर्वा न करता वालकरांनी प्रत्येक कंपनीजवळ जाऊन स्वसंरक्षणासाठी गोळीबाराचा आदेश दिला. वालकर आपले कर्तव्य बजावत असताना पाकिस्तानी सैनिकांकडून झालेल्या हल्ल्यात ते दोन वेळा जखमी झाले, तरीही त्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पूर्ण केली. त्यानंतर शत्रूकडून रात्रभर गोळीबार सुरू होता. जखमी झालेले असतानाही त्यांनी रात्रभर शत्रूचा सामना केला. दुसर्‍या दिवशी सकाळ झाली तरीही वालकर मागे हटले नाहीत. अचूक पद्धतीने तोफगोळ्यांचा नेमका मारा करीत त्यांनी शत्रुसैन्य जायबंदी केले. या वेळी त्यांनी शत्रूच्या चार सैनिकांना ठार केले आणि शत्रूला माघार घेण्यासही भाग पाडले. मात्र शत्रूच्या गोळ्यांनी झालेल्या गंभीर जखमांनी त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना मरणोत्तर ‘महावीरचक्रा’ने सन्मानित करण्यात आले. - समीर कोडिलकर

विल्सन, पीटर मेनार्ड आरविंग वायूसेना - एअर कमोडोर २९ नोव्हेंबर १९२७ - पीटर विल्सन यांचा जन्म मुंबईत झाला. १जून१९४९ रोजी पीटर हे हवाई दलात रूजू झाले. विंग कमांडर पीटर विल्सन यांची नेमणूक १९६५ च्या पाकिस्तान युद्धात बॉम्बफेकी विमानांच्या स्क्वाड्रनवर झाली होती. या स्क्वाड्रनचे नेतृत्व विल्सन यांच्याकडे होते. कच्छ परिसरातील बादिन भागात असणारी शत्रू पक्षाची रडार यंत्रणा उध्वस्त करण्याची कामगिरी यांच्यावर सोपविण्यात आली होती. ही रडार यंत्रणा नष्ट करणे अत्यंत कठीण होते. कारण लढाऊ विमानांचा अचूक वेध घेता येईल अशा मोठ्या बंदुका तसेच तोफा या रडारच्या आजूबाजूला तैनात ४८४ शिल्पकार चरित्रकोश