पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जगदाळे, किसन रामराव संरक्षण खंड जगदाळे, किसन रामराव भूसेना - हवालदार वीरचक्र १४ ऑक्टोबर १९४८ किसन रामराव जगदाळे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पेडगाव येथे झाला. वयाच्या सतराव्या वर्षी, दि. १४ ऑक्टोबर १९६५ रोजी ते सेनादलात रुजू झाले. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या एका तुकडीत ते शिपाई म्हणून कार्यरत होते. पूर्व भागातील शत्रूचे एक ठाणे जिंकण्याची जबाबदारी त्यांच्या तुकडीवर सोपवण्यात आली होती. या तुकडीने त्या ठाण्यावर चढाई केली. पण शत्रूच्या मशीनगन्स आणि तोफांच्या मान्यांपुढे त्यांच्या तुकडीचे प्रयत्न असफल होत होते. ही परिस्थिती पाहून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता जगदाळे पुढे सरसावले. रांगत-रांगत ते शत्रूच्या ठाण्याच्या रोखाने निघाले. शत्रूच्या खंदकाजवळ येताच त्यांनी हातबॉम्ब फेकून पहिली मशीनगन बंद पाडली. तसेच रांगत पुढे जात त्यांनी शत्रूच्या धडाडणा-या तोफा नि कडाडणा-या मशीनगन्स निकामी केल्या. त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना 'वीरचक्र देण्यात आले. जठार, मधुकर शांताराम वायुसेना - विंग कमांडर वीरचक्र ११ एप्रिल १९३४ मधुकर शांताराम जठार यांचा जन्म पुण्यात झाला. दि. ६ नोव्हेंबर १९५४ रोजी त्यांना वायुसेनेत नियुक्ती मिळाली. १९६५ च्या भारत-पाक युद्धात ते एका लढाऊ स्क्वॉड्रनचे कमांडर होते. त्या स्क्वॉड्रनने चौदा लढाऊ उड्डाणे केली. | दि. ७ सप्टेंबर १९६५ रोजी भिगरनवाला हवाई तळावर हल्ला करण्याकरिता त्यांनी आठ विमानांची व्यूहरचना करून हल्ला केला. या हल्ल्यात शत्रूचे एक सेबरजेट नष्ट करून दुसरे विमान निकामी केले गेले. यशस्वी हल्ले करून त्यांनी आपले स्क्वॉड्रन परत आणले. या कामगिरीसाठी त्यांना दि. ७ सप्टेंबर १९६५ रोजी ‘वीरचक्र' प्रदान केले गेले. ते पुढे विंग कमांडर पदापर्यंत पोहोचले. शिल्पकार चरित्रकोश ५२०