पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड पिंगळे, प्रकाश सदाशिव पाटील, सीताराम भूसेना - सुभेदार वीरचक्र २६ नोव्हेंबर १९४१-२१ ऑक्टोबर १९८७ सीताराम पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळी या गावी झाला. दि. २६ नोव्हेंबर १९६२ रोजी ते लष्करात अठराव्या गढवाल रायफल्स' या विभागात रुजू झाले. भारतीय शांतिसेनेचा भाग म्हणून सुभेदार सीताराम पाटील यांची नेमणूक श्रीलंकेत झाली होती. श्रीलंकेत १९८७ या वर्षी सुरू असलेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या वेळी सुभेदार सीताराम संरक्षणासाठी एका भागात तैनात होते. २० ऑक्टोबर या दिवशी ते व त्यांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी रॉकेटचा मारा सुरू केला. त्या रात्री व दुस-या पूर्ण दिवशी त्यांना व त्यांच्या तुकडीला दहशतवाद्यांच्या जोरदार गोळीबाराला सामोरे जावे लागले. परंतु त्यांच्या तुकडीच्या अधिका-याच्या प्रोत्साहनामुळे व अतुलनीय धैर्यामुळे सुभेदार सीताराम व इतर जवानांनी शर्थीने आपली जागा सांभाळली व शत्रूला यशस्वी होऊ दिले नाही. याच हल्ल्यादरम्यान सुभेदार सीताराम पाटील यांना गोळी लागून त्यात त्यांचा मृत्यू झाला. सुभेदार सीताराम पाटील यांनी लष्कराची शौर्याची व निष्ठेची परंपरा राखत स्वत:च्या जिवाचे बलिदान दिले यासाठी त्यांना दि. २६ जानेवारी १९८८ रोजी मरणोत्तर वीरचक्र' प्रदान करण्यात आले. प । पिंगळे, प्रकाश सदाशिव वायुसेना - एअर कमोडोर वीरचक्र १२ मार्च १९४१ प्रकाश सदाशिव पिंगळे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांना दि. १० नोव्हेंबर १९६२ रोजी वायुसेनेत कमिशन मिळाले. | दि. १६ सप्टेंबर १९६५ रोजी ते दोन विमानांच्या सेक्शनचे नेतृत्व करत होते. पाकिस्तानच्या सेबरजेट एफ-८६ या लढाऊ विमानाचा मुकाबला त्यांचे सेक्शन करत असताना मागून दुसरे सेमरजेट हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी त्वरित आपले स्थान बदलून अतिशय कौशल्याने हालचाली करून दोन्ही विमाने पाडली. या कामगिरीबद्दल त्या वेळी फ्लाइंग ऑफिसर या पदावर असणा-या पिंगळेचा ‘वीरचक्र' देऊन गौरव करण्यात आला. पुढे त्यांनी एअर कमोडोर' हे पद भूषवले. शिल्पकार चरित्रकोश ५४१