पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भिंगारदिवे, गोपीनाथ अहिलजी संरक्षण खंड होता. कमांडर म्हणून लेफ्टनंट प्रबोधचंद्र भारद्वाज यांची नेमणूक पैरेंशूट रेजिमेंटमध्ये करण्यात आली. दि. १६ डिसेंबर १९७१ रोजी फिरोजपूर परिसरातील शत्रूच्या ठाण्यावर कब्जा करण्याचा आदेश त्यांच्या प्लॅटूनला देण्यात आला होता. ही जागा भुसुरुंग पेरून आणि अडथळे उभारून शत्रूने संरक्षित केलेली होती. हा हल्ला सुरू असतानाच बंकरमध्ये लपलेल्या शत्रुसैन्याने त्यांच्या प्लॅटूनवर गोळीबार करण्यास सरुवात केली. भारद्वाज त्वरित त्या बंकरवर चालून गेले. त्यांनी त्या बंकरमध्ये हातबॉम्ब टाकला. त्यानंतर लगेचच बंकरमध्ये उडी घेऊन त्यांनी आतील शत्रुसैनिकांना संगिनीने ठार केले. तसेच त्यांनी बंकरमधील मध्यम पल्ल्याच्या मशीनगनचाही ताबा घेतला. | या कारवाईत कपाळावर गोळी लागून ते जखमी झाले. तशा अवस्थेतही त्यांनी शत्रूच्या दुस-या बंकवर हल्ला केला. इथेही त्यांनी आधी हातबॉम्ब टाकला व बंकरमधील शत्रुसैनिकांना संगिनीने ठार केले. या बंकरमधील मशीनगनवरही त्यांनी लगेचच ताबा मिळवला. या असीम शौर्याबद्दल त्यांना ‘बीरचक्राने सन्मानित करण्यात आले. । भ भिंगारदिवे, गोपीनाथ अहिलजी भूसेना - हवालदार वीरचक्र १ जुलै १९३६ गोपीनाथ अहिलजी भिंगारदिवे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार या गावी झाला. दि. १८ जानेवारी १९५७ या दिवशी ते लष्करी सेवेत रुजू झाले. कच्छ भागातल्या सरदार पोस्ट येथे ते मोबाइल कंट्रोलर म्हणून कार्यरत होते. १९६५ च्या पाकिस्तान युद्धामध्ये पाक सैन्याकडून गोळीबार होत असतानाही सरदार पोस्ट येथे तैनात राहून त्यांचे निरीक्षण सुरू होते. | दि. २० एप्रिल १९६५ या दिवशी, दुपारी एकच्या सुमारास एक जखमी शिपाई सरदार पोस्टकडे एकटाच परतत होता. तळाकडे येणा-या मार्गात संरक्षणाच्या दृष्टीने भूसुरुंग पेरून ठेवण्यात आले होते. तो शिपाई बेशुद्ध होऊन याच परिसरात कोसळला. त्यावेळी शत्रूकडून तोफगोळ्यांचा आणि गोळीबाराचा भङिमार सुरू होता आणि आपली सेना प्राणपणाने प्रतिकार करत होती. भयंकर गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा चालू असताना भूसुरुंगांच्या परिसरात जाण्यात खूपच धोका होता. पण भिंगारदिवे बेधडकपणे पुढे गेले. बेशुद्ध पडलेल्या जखमी शिपायाला घेऊनच ते पोस्टवर परतले. त्यांच्या समयोचित कृतीमुळे त्यांनी एका सैनिकाचा जीव वाचवला. अतुलनीय शौर्य, निष्ठा या त्यांच्या गुणांमुळे त्यांना ‘वीरचक' देण्यात आले. शिल्पकार चरित्रकोश ५४६