पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माळी, अरुण रामलिंग संरक्षण खंड तोफांचा अखंड भडिमार सुरू असतानाही अँथनी माऊशो यांनी त्यांचे टेहळणीचे काम धैर्याने सुरूच ठेवले. यातल्याच एका मोहिमेत त्यांनी शत्रूचे रणगाडे हेरले. नंतर त्यांतील २५ पॅटन रणगाड्यांवर आपल्या विमानांनी हल्ला करून ते नष्ट केले. या कार्माबद्दल त्यांना वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. माळी, अरुण रामलिंग भूसेना - लान्स हवालदार वीरचक्र ७ जुलै १९५६ अरुण रामलिंग माळी यांचा जन्म बीड जिल्ह्यातील पाचगाव येथे झाला. दि. ६ फेब्रुवारी १९७६ रोजी ते दुस-या मराठा लाइट इन्फन्ट्रीत दाखल झाले. | दि. १७ डिसेंबर १९८८ चा दिवस त्यांच्यासाठी काही वेगळे घेऊन समोर आला. तेव्हा ते श्रीलंकेतील भारतीय शांतिसेनेत तैनात होते. श्रीलंकेतील पनोचीमुनाई येथील दहा घरांचा शोध घेण्याची जबाबदारी अरुण माळी आणि त्यांच्या दोन सहका-यांवर सोपविण्यात आली होती. या घरांमध्ये दहशतवादी लपून बसल्याचे वृत्त मिळाले होते. घरांच्या शोधात पुढे पुढे जात असताना जवळच्याच एका घरात लपून बसलेले दोन दहशतवादी अचानक पुढे उभे ठाकले. । दहशतवाद्यांनी त्यांच्याजवळच्या एके-४७ रायफलीतून माळी आणि त्यांच्या सहका-यांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यांनी बॉम्बफेक करण्यासही सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या या जोरदार हल्ल्यामुळे माळी आणि त्यांचे सहकारी सुरूवातीला हतबल झाले होते. मात्र हा हल्ला परतवून लावला नाही, तर आपल्यापैकी कोणावरही जीव गमवायची वेळ येऊ शकते, असा विचार माळी यांच्या मनात आला. कंपनी कमांडरच्या आदेशाची वाटही न पाहता माळी यांनी क्षणार्धात आपल्या सैनिकांना सूचना देण्यास सुरुवात केली. |सैनिकांना जोरदार गोळीबार करण्याचे आदेश देत त्यांनी दहशतवादी लपून बसलेल्या घराकडे रांगत जाण्यास सुरुवात केली. घरापासून केवळ वीस मीटरवर आल्यावर माळी यांनी गुडघ्यावर बसून स्वत:च्या सुरक्षेचा विचार न करता । घराच्या दिशेने गोळीबार करण्यास प्रारंभ केला. त्यांच्या या हल्ल्यापुढे शत्रू निष्प्रभ झाला. | माळी यांनी एकट्याने घरात लपून बसलेल्या चार दहशतवाद्यांना ठार केले आणि दोन एके-४७ रायफली आणि ११२ गोळ्या हस्तगत केल्या. दहशतवाद्यांचा पाडाव करताना त्यांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल त्यांना दि. २६ जानेवारी १९९० रोजी सन्मानित करण्यात आले. ५५० शिल्पकार चरित्रकोश