पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विश्वनाथन, रामकृष्णन संरक्षण खंड रॉकेट लाँचर च्या सहाय्याने जमिनीवरील व आकाशातील संभावित हुल्ल्यांपासून या ठाण्याचे संरक्षण केले. | दि. २५ जून १९८७ रोजी सहका-यांसह खंदकावर हातबॉम्बचा हल्ला करून दि. २६ जून १९८७ रोजी पहाटे दोन वाजता खंदकावर ताबा मिळविला. तिस-या रात्री मेजर वारिंदर सिंग व त्यांच्या सहका-यांनी शून्य तापमानात ८४ मि.मि. रॉकेट लाँचरद्वारा दुस-या खंदकावर हल्ला करून त्यावर ताबा मिळविला. नायब सुभेदार बाना सिंग यांच्या मदतीने हल्ला करून शेवटच्या खंदकावर ताबा मिळवला. हे कार्य करताना मेजर वारिंदर सिंग हे गंभीररित्या जखमी झाले. त्यातच मेजर वारिंदर सिंग यांना वीरगती प्राप्त झाली. ल, विश्वनाथन, रामकृष्णन भूसेना - लेफ्टनंट कर्नल वीरचक्र १२ जानेवारी १९६० - १९९९ विश्वनाथन रामकृष्णन यांचा जन्म मुंबई येथे झाला. दि. १३ जून १९८१ पासून त्यांनी अठराव्या ग्रेनेडिअर्समध्ये सेवा करण्यास सुरुवात केली. ऑपरेशन विजय दरम्यान लेफ्टनंट कर्नल विश्वनाथन रामकृष्णन हे अठराव्या ग्रेनेडिअर्सच्या दुस-या क्रमांकाच्या अधिकारपदावर कार्यरत होते. द्रास परिसरातील तोतोलिंग भागात ही कारवाई सुरू होती. ते शत्रूला विरोध करण्यासाठी गेले असता, आग आणि तोफखान्यातून होणारा प्रचंड मारा यांच्यामध्ये ते अडकून पडले. पंधरा हजार फूट उंचीवर अवघड आणि कठीण परिस्थिती असताना त्यांनी आपल्या दुर्दम्य पराक्रमाचे दर्शन घडविले. हल्ल्यादरम्यान त्यांना बंदुकीच्या गोळ्यांमुळे जखमा झाल्या. गंभीररीत्या जखमी असूनसुद्धा तिथून परतण्यास त्यांनी नकार दिला. उलट आपल्या तुकडीतील सैनिकांना पुढे जाण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी शत्रूच्या तीन तुकड्या नेस्तनाबूत केल्या आणि शत्रूच्या चार घुसखोरांना एकट्याने परतवून लावले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्यांच्या तुकडीला शत्रूच्या भूमीमध्ये सुरक्षितपणे प्रवेश करता आला, ज्यामुळे ‘पॉइंट ४५९०' वर ताबा मिळविणे शक्य झाले. विश्वनाथन रामकृष्णन हे जरी त्यांच्या तुकडीच्या दुय्यम श्रेणीवर होते, तरी त्यांनी आपल्या तुकडीचे नेतृत्व केले आणि तोतोलिंगमध्ये शत्रूच्या जागी आपले स्थान निर्माण करण्यास प्राधान्य दिले. अखेर झालेल्या जखमांमुळे त्यांना वीरमरण आले. १९९९ मध्ये त्यांना मरणोत्तर वीरचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ५५८ शिल्पकार चरित्रकोश