पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड सामंत, सुरेश गजानन साठ्ये, अरुण वसंत वायुसेना - फ्लाइट लेफ्टनंट वीरचक्र १ एप्रिल १९४३ अरुण बसंत साठ्ये यांचा जन्म यवतमाळ येथे झाला. दि. २५ डिसेंबर १९६४ पासून त्यांनी भारतीय वायुसेनेत सेवा करण्यास सुरुवात केली. | दि. ४ डिसेंबर १९७१ रोजी फ्लाइट लेफ्टनंट अरुण साठ्ये यांचा एका हवाई तळावर हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लढाऊ विमानांच्या तुकडीत समावेश करण्यात आला. त्या वेळी ते स्क्वॉड्रनमध्ये एक वरिष्ठ पायलट म्हणून कार्यरत होते. जमिनीवरून होणा-या तीव्र प्रतिकाराची पर्वा न करता त्यांनी दोन हल्ले यशस्वी केले. पहिल्या हल्ल्यात त्यांनी एक इमारत उद्ध्वस्त केली. कामगिरी पूर्ण करून परतत असताना त्यांना जमिनीवर शत्रूचे विमान दिसले. त्या विमानात इंधन भरण्याचे काम सुरू होते. त्यांनी पुन्हा मागे फिरून त्या विमानावर हल्ला चढवला व ते नष्ट केले. त्या विमानावर हल्ला करून येताना त्यांना त्यातून निघणा-या प्रचंड ज्वाळा व धुराचा लोट दिसला. या कामगिरीदरम्यान अरुण साठ्ये यांनी धाडस, कौशल्य आणि कार्याप्रती अत्युच्च निष्ठेचे प्रदर्शन घडवले. या कामगिरीबद्दल त्यांचा ‘बीरचक्र' पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सामंत, सुरेश गजानन नौसेना - लेफ्टनंट वीरचक्र ३१ मे १९४१ - ५ डिसेंबर १९७१ | रत्नागिरी जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हरकुट या गावात सुरेश गजानन सामंत यांचा जन्म झाला. पार्क महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण करून दि. ११ एप्रिल १९६६ रोजी ते भारतीय नौसेनेत दाखल झाले. । १९७१ च्या पाकिस्तान युद्धात लेफ्टनंट सुरेश सामंत हे भारतीय नौदलाच्या आय.एन.एस.किहतान या जहाजावर तैनात होते. त्यांच्या ताफ्याने पाच डिसेंबरच्या रात्री कराचीवर हल्ला केला. कराचीच्या बंदरात असलेली जहाजे व बंदरातील इतर इमारती व सामग्रीवर हल्ला करण्यासाठी भारतीय जहाजांची योग्य रचना करण्याची जबाबदारी दिशादर्शक (नॅव्हिगेटिंग) अधिकारी म्हणून लेफ्टनंट सुरेश सामंत यांच्यावर होती. त्या मोहिमेत त्यांनी कामाप्रती निष्ठा आणि कौशल्याचे प्रदर्शन करून उद्दिष्ट साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र दुर्दैवाने पाण्याखालील विध्वंसक अस्त्रे व पाणसुरुंग शोधताना लेफ्टनंट सुरेश सामंत यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांना मरणोत्तर वीरचक्र' प्रदान करून गौरवण्यात आले. स । शिल्पकार चरित्रकोश ५६५