पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड सुर्वे, अप्पासाहेब दादासाहेब शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालय आणि कोल्हापुरातील वाणिज्य महाविद्यालयात झाले. शकरगढ़ लढाईमध्ये मेजर अप्पासाहेब सुर्वे हे गोरखा रायफल्सच्या तुकडीचे नेतृत्व करत होते. अत्यंत धैर्याने आणि स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्यांनी दबा धरून बसलेल्या शत्रूला वेढा घातला. या वेळी सुर्वे यांना खंदकात ठेवलेल्या मशीनगन्स आणि शस्त्रसाठा हाती लागला. शत्रूकडून झालेले दोन हल्ले परतवून लावून आणि इतर संकटांची पर्वा न करता ते आपल्या कामगिरीच्या जागी अढळ राहिले. | त्यानंतर मात्र परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याचे लक्षात येताच त्यांच्या कमांडिंग ऑफिसरने सुर्वे यांना माघार घेण्याची आज्ञा दिली. सैनिक माघार घेत असताना सुर्वे स्वतः मागे थांबले. शत्रूकडूनही मध्यम पल्ल्याच्या मशीनगनमधून गोळीबार सुरूच होता. गोळी लागून सुर्वे यांच्या मांडीला जबर जखम झाली, तरीही पूर्ण तुकडी निघून जाईपर्यंत त्यांनी शत्रूवर गोळीबार करून तुकडीतील सैनिकांना संरक्षण दिले. शत्रूच्या जोरदार गोळीबारास न जुमानता आपल्या वैयक्तिक धैर्याने व चिकाटीने त्यांनी आपल्या सैनिकांना दृढतेने प्रेरित करून लक्ष्य गाठण्यास उद्युक्त केले. या मोहिमेत मेजर सुर्वे यांनी उच्च प्रतीच्या शौर्याचे व नेतृत्वाचे प्रदर्शन केले. शिल्पकार चरित्रकोश ५६९