पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होतं. त्यामुळं एकदम गोंधळ उडून गेला. मी कोपरगावला गेलो आणि त्या माणसाबद्दल चौकशी केली तर कोपरगावचे लोक म्हणाले, 'असा कुणी माणूस आमच्या माहितीत नाही!' आणि म्हणे अखिल महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा अध्यक्ष! तेव्हा पदाधिकारी नेमणं जर टाळता येणार नसेल आणि कुठंतरी अशी माणसं घोटाळे उडवून देणार असतील तर आंदोलनाच्या भागातील आपला निश्चित मनुष्य कोण हेही पाहायला हवे. त्याच्यातसुद्धा वेळ पडल्यास फेरबद्दल करावे लागतील. घटना, कार्यकारिणी हे विषय अखिल महाराष्ट्र पातळीवर सध्या तरी विचारात घेणं उपयोगाचं नाही.

 ■ ■

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १३०