पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रकरण : १३
 आंदोलनाचे तंत्र


 शेतकऱ्यांची आंदोलनं कशी उभारायची, त्याची तंत्र काय, साधनं कोणती याचा आता विचार करू या.

 आंदोलनाचा हेतू शेतीमालाला भाव मिळवून घेणे हा आहे. मग त्याला तंत्र काय वारायचं? व्यापारी जे तंत्र वापरतात तेच वापरतात तेच वापरायचं. व्यापारी जसं एकमेकांत ठरवतात की आज कुणीही व्यापाऱ्यानं अमुक एका मालाला अमुक अमुक याच्यावर भाव द्यायचा नाही. त्याचप्रमाणे आपण उलट ठरवायचं आहे की अमुक अमुक याच्यावर भाव द्यायचा नाही. त्याचप्रमाणे आपण उलट ठरवायचं आहे की अमुक इतका भाव मिळाल्याखेरीज आपण आपला माल विकायचा नाही. इतकं सोप तंत्र आहे. तुम्हाला वाटेल की हे दिसायला सोपं आहे; तरी प्रत्यक्षामध्ये कठीण आहे. कारण आज शेतकऱ्याची नड आहे, घाई आहे; त्याला दम काढता येत नाही. हे खरं असलं तरी याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या बाजूला वाटेल तितका दम काढता येईल. दुसऱ्या बाजूलाही घाई आहे. पण आमची नड आम्हाला इतकी वाटते की त्यांची घाई कुठे सुरू होते याचा आम्ही अंदाजच घेत नाही. आपल्या ऊस आंदोलनाच्या वेळी आम्ही सांगितलं होतं की कुणीही आपल्या शेतातला ऊस १५ नोव्हेंबरपूर्वी कापू देऊ नका. कारण २३ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या तीन आठवड्यांत समोरच्या बाजूची नड इतकी होईल की साखरेचा भाव ५० रु. पर्यंतसुद्धा जाईल. लोकांनी आपल्या शेताच्या बांधावर बसून ऊस कापू न देण्याचा निर्धार केला आणि आंदोलन सुरू केले. पण साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि इतर मंडळींनी हरामखोरी करून कारखाने सुरू केले. त्यामुळे आंदोलनात वेगळं तंत्र अवलंबवावं लागलं. पण मुळात उसाच्या बाबतीच दुसऱ्या बाजूची नड ही केवळ तीन आठवड्यांची असेल तर काही बाबतीत सहा आठवड्यांची. तंबाखूच्या बाबतीत तर अशी नड सात महिन्यांची आहे. कारण त्यांना यंदा जो

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १३१