पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि भात या गोष्टी एकत्र घेतल्या. कारण दूध हे फार मजबूत आहे. चार दिवस जरी दूध नाही दिलं तर धावपळ उडते. मग त्या दांडगट भावाचा फायदा घेऊन त्यातल्या त्यात जो दुबळा भाऊ आहे त्या भाताचा फायदा करून घ्यायचा. म्हणून दूध आणि भात या गोष्टी एकत्र घेतल्या. कारण दूध हे फार मजबूत आहे. चार दिवस जरी दूध नाही दिलं तर धावपळ उडते. मग त्या दांडगट भावाचा फायदा घेऊन त्यातल्या त्यात जो दुबळा भाऊ आहे त्या भाताचा फायदा करून घ्यायचा. म्हणून दूध भात आंदोलन. मग तुम्ही असं म्हणाल दूध-भात-ज्वारी का नाही? यादी फार मोठी केली की त्या मागणीचा जोर जातो. म्हणून नुसतं दूधभात आणि ज्वारीच्या आंदोलनाकरता आणखी एक मार्ग आहे. आतापर्यंत तुम्हाला आंदोलनाच्या तंत्राविषयीची कल्पना दिली. त्यावरून ज्वारीचा लढा कोणत्या प्रकारे लढवता येईल याचा तुम्हीच अंदाज बांधा. हा अंदाज बांधताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की, आजपर्यंत आपण जे लढे दिले ते नगदी पिकांसाठी दिले. हा माल १०० टक्के बाजारात जातो. पण धान्याच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. ७० टक्के धान्य आपण शेतकरीच खातो. तेव्हा धान्याच्या लढ्याबाबत विचार करताना ३० टक्के धान्य बाजारात जाते हे लक्षात घ्यायला हवे आणि आपण आंदोलन कशा तऱ्हेने आखतो? आपल्याला काडीही मोडायची नाही आणि आपला डोळाही फोडायचा नाही. तेव्हा ज्वारीच्या आंदोलन तंत्राबाबत तुम्ही अंदाज करा-आम्ही काही जाहीर करू शकत नाही.

 भावाच्या पातळीवर उभं करण्याचं हे शेतकरी आंदोलन आता लोकप्रिय होऊ लागलं आहे. असं आंदोलन उभं केलं म्हणजे शेतकरी मागे येतात हे कळल्यावर बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलंय की आपणही असं आंदोलन उभं केलं पाहिजे. इतके दिवस काही त्यांना जाग आली नव्हती. एखादा सिनेमा चांगला चालला की कसं होतं? 'जय संतोषी माँ' या सिनेमाला खूप लोकप्रियता मिळाली. लगेच लोकांना वाटलं, 'अरे, भक्तीचा सिनेमा चांगला चालतो.' की मग लागले भक्तीचे सिनेमे काढायला ! अशा पद्धतीने शेतकरी आंदोलनं उभी राहू पाहतायत. एका पक्षानं जाहीर करून टाकलं की आम्हाला ज्वारीला २०० रु. भाव मिळाला पाहिजे म्हणून आमचं आंदोलन. इतका भाव का मिळाला पाहिजे, कशासाठी मिळाला पाहिजे वगैरे काही नाही. ते आपलं जाहीर करून टाकतात. पण ही मंडळी आंदोलन कधी चालू करतात, ते बंद कधी करतात याकडे हल्ली लोक

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १३९