पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 परिशिष्ट क्र.१
 भारतीय शेतीची पराधीनता
 प्रस्तावना


 शेतकरी संघटनेचे पहिले अधिवेशन जानेवारी १९८२ मध्ये सटाण्याला भरले होते. मी या अधिवेशनाला हजर राहिलो. त्या अधिवेशनातील शेतकऱ्यांचा उत्साह, सामान्य कार्यकर्त्यांची भाषणे व श्री. शरद जोशींचे तेथील मार्गदर्शन यामुळे मी संघटनेच्या विचाराकडे व आंदोलनाकडे ओढला गेलो. त्यावेळी वृत्तपत्रांतील संघटनेवरील टीकेचा फोलपणा लक्षात आला आणि भारताच्या दारिद्र्याचा मूलभूत कारणांचे प्रथमच एवढे लख्ख भान आले.
 वर्धा येथे १ जानेवारी १९८१ रोजी भरलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या शिबिराच्या कॅसेटस् प्रा. म्हात्रे यांच्याकडून मिळाल्या त्या ऐकल्या आणि संघटना व शरद जोशी यांच्या तत्त्वज्ञानासंबंधीच्या माझ्या धूसर कल्पना अधिक स्पष्ट झाल्यानंतर सर्व कॅसेट्सचे शब्दांकन केले. त्यातील पुनरावृत्ती व विवेचनाच्या ओघात अनावश्यक वाटलेल्या अशा मजकुराला दूर ठेवून, पुनः सर्व लिहून काढले हे येणार नाही याची मुख्य काळजी घेतली. त्यांची शैली हा या पुस्तकाचा, विचारांइतकाच महत्त्वाचा भाग आहे, असे वाटते.
 या सर्व कामाने मला अत्यंत आनंद झाला. एका प्रगल्भ, बुद्धिवादी मनाच्या सान्निध्यात माझे हे कामाचे दिवस अक्षरशः सार्थकी लागले. अर्थात् त्यासाठी मी प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी व प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांचाही आभारी आहे.

 या पुस्तकामुळे कार्यकर्त्यांना खेडोपाडी प्रचार करताना फायदा निश्चितच होणार आहे. शेतीचे अर्थशास्त्र, शेतीतील तोट्याची मीमांसा, शेतकऱ्यांच्या पद्धतशीर होणाऱ्या नागवणुकीचे स्वरूप, संघटनेचा विचार, आंदोलनाची तंत्रे या सर्व गोष्टीसंबंधीची चर्चा या पुस्तकात आलेली आहे. हे पुस्तक परिपूर्ण आहे असा दावा अर्थातच नाही. शिबिराची वेळ व चर्चेचा प्रवाह या दोन मर्यादा मुख्य आहेत. पण शेतकरी संघटनेच्या तत्त्वज्ञानाचा जो ग्रंथ पुढे तयार होईल तेथवर पोहचण्याची ही

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १५०