पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करायचा आहे.
 आम्ही शेतकऱ्यांनी शेतीव्यवसाय गंभीरपणे घेतला आहे. शेतकऱ्यांची आंदोलने यशस्वी का झाली नाहीत? शेतकरी-मजूर ही फूट नको. एकजूट हवी. म. गांधींनी इंग्रज शोषक होते म्हणूनच लढा उभारला ना? शेतकऱ्यांमधील भेद कसे दूर होणार?


 मी जेव्हा शेतकरी शब्द वापरतो, तेव्हा त्यात शेतमजूरसुद्धा आहेत. शेतकरी दरिद्री का? त्याच्या मालाला भाव नाही म्हणून. त्याच्या मालाला भाव का नाही? हे सरकारी धोरण आहे म्हणून याच्याकरिता काय करायला पाहिजे? सर्व शेकऱ्यांनी एकत्र व्हायला पाहिजे. जात, धर्म, पक्ष कशाचाही विचार न करता एकत्र व्हायला पाहिजे. या तीनच गोष्टी लक्षात ठेवा. शेतमजुराचे नाव घेऊन तुमच्यामध्ये कुणीतरी भांडणं लावील. कारण या दोघांची एकी झाल्यावर शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणे भाग पडेल, हे टाळण्यासाठी काहीजण सांगतील की हा शेतकरी आहे आणि तू शेतमजूर आहेस? काय फरक आहे शेतकरी व शेतमजुरात? आज समजा एखाद्याकडे ५६ एकर जमीन आहे. पुढच्या पिढीत त्याच्या चार मुलांना प्रत्येकी १४ एकर जमीन राहील. नवीन जमीन घेणे शक्य नाही. त्यानंतरच्या पिढितील त्याचे नातू शेतमजूर होतील व नंतरचे भूमिहीन. म्हणजे बाप बागायतदार, मुलगा छोटा शेतकरी व पुढच्या पिढ्या शेतमजूर!

 दुधाच्या लढ्यासंबंधी संघटनेची भूमिका कोणती आहे?
 हे आंदोलन केव्हा होईल? तेव्हाच का?

 शेतीमालाच्या बाजारभावासंबंधी जी आंदोलने होतील ती आर्थिक स्वरूपाची आहेत. राजकीय नाहीत काहीतरी मनामध्ये आकडा घ्यायचा, जाहीर करयचा आणि कुठेतरी एक आंदोलन चालू करायचे, हे शेतकऱ्यांच्या घाताचे आहे. कालच मी वर्तमानपत्रात वाचले; विदर्भाच्या एका भागात दुधाला तीन रु. लिटर भाव मिळावा म्हणून एक छोटे चार दिवसांचे आंदोलन झाले. काय उपयोग झाला त्याचा? शेतकऱ्यांचे दूध तेवढे फुकट गेले! मिळाले काहीच नाही. दुधाचा उत्पादन खर्च सध्या आम्ही काढतो आहोत आणि आजपर्यंत जो अभ्यास झालेला आहे,

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १५५