पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचारले : जर अशा तऱ्हेचा पाऊस झाला तर तुमच्या मते त्याचा शेतकरी आंदोलनावर परिणाम होईल की नाही? जर गव्हाच्या पेरणीची वेळ आली तर आंदोलन स्थगित करायला पाहिजे की नको? शहरातल्या कामगारांच्या आंदोलनाचा तुम्हाला जो काही अनुभव असेल त्याच्या आधारे शेतकरी आंदोलनाविषयी कुणीही उठावं आणि काहीही बोलावं याला अर्थ नाही. मुद्दा हा की, लोकांना बोलू द्या. यांचे आपण ३३ वर्षे ऐकलेय. काय कल्याण झालेय? आता शेतकरी संघटनेच्या विचाराला दोन वर्षे तुम्ही द्या. जर नाही जमले तर सोडून द्या. मतं मागायला काही आम्ही तुमच्याकडे येणारच नाही. जा तुमच्या नेहमीच्या पुढाऱ्यांच्या मागे. आम्ही तुमचे कल्याण इच्छितो. पण जर काही शेकऱ्यांचे भले व्हावे असे वाटत असेल आणि शेतकऱ्याला केवळ लाचारीने जगावे लागू नये, ताठ, मानेने, अभिमानाने जगता यावे असे वाटत असेल तर या कार्याला दोन वर्षे पाठिंबा द्या. आजपर्यंत पुढाऱ्यांनी पुष्कळ सोन्याची कौले चढवली तुमच्या घरावर!
 फक्त हे काम करा : गावोगाव जा. सगळीकडे जाणे मला किंवा कार्यकर्त्यांना शक्य नाही. तुमच्यापैकी प्रत्येकजण शेतकरी संघटनेचा पुढारी आहे, नेता आहे, कार्यकर्ता आहे. आमच्याकडे कुणी अध्यक्ष नाही आणि पुढारी नाही. ज्याने त्याने आपल्या घरचे हे काम आहे असे समजून गेले पाहिजे आणि हा विचार गावोगाव समजावून सांगितला पाहिजे. टीका करणाऱ्या कोणालाही दोन प्रश्न विचारायचे :
 शेतीमालाला भाव देता की नाही ते बोला आणि इतकी वर्षे तुम्ही काय केले?
 विदर्भातील ऐतिहासिक परंपरा अशी आहे की, मी तर ५०,००० लोक म्हणतो आहे! आज इथे बसलेल्या मंडळींनी किंवा शिबिरात आलेल्या मंडळींनी जरी आज ठरवले तरी येत्या १० दिवसांत ही मंडळी १० लाख शेतकरी उभे करू शकतील. एवढी एकी, परंपरा विदर्भात आहे.
 हे करून दाखवा आणि कोणत्याही शेतकऱ्याला दोन वर्षांमध्ये लाचारीने जगायची वेळ येणार नाही, एवढे मी तुम्हाला आश्वासन देतो.

 सरप्लस, दूरच, मीठ-मिरचीसाठीही ज्याला धान्य विकावे लागते,

 असा मोठा वर्ग आहे. त्याबद्दलही जोशी यांनी विचार मांडावे.
 पूर्ण शोषण होते आहे अशा भूमिहीन शेतमजुरासंबंधीही विचार मांडावे.

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १५७