पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत. हेच जर शेतमजुराने काढले असते तर हे झाले नसते, ही पहिली गोष्ट.
 आम्हाला भाव वाढवून मिळाले की आम्ही मजुरीही वाढवून देऊ हा शेतकऱ्यांचा दावा! यातला भ्रामकपणा असा आहे की ७०० रु. कापसाचा भाव धरला आहे तेव्हा त्याच्यामध्ये शेतकरी असे दाखविण्याचा प्रयत्न करतो की त्या भावात मजुरी ४.८८ रु. आहे. यात नेमकी फसवणूक अशी आहे की ४.८८ रु. हा भाव ५१७ रु. ने काढला आहे. त्यानंतर जेव्हा २५% Inflation ने तुम्ही गुणता तेव्हा मजुरीला २५% ने गुणा आणि ती गुणली तर ६.१० रु.रोजी येते. पुरुषाला ७ रु. व स्त्रीला ५ रु.द्या. पण ७०० रु. कापसाच्या भावामध्ये हे मजुरीचे दर धरलेले आहेत हे सत्य जाहीरपणे सांगायला हा शेतकरी तयार नाही. हा दुसरा मुद्दा.
 तिसरा मुद्दा असा की ओलीत शेती असूनही नाशिक जिल्ह्यामध्ये मजुरीचा दर ४ रु., ५ रु. होता त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसा आला किंवा ओलीत शेती वाढली म्हणजे मजुराकडे पैसा येतो हे काही मला खरे वाटत नाही. मुद्दा असा की शेतमजुरांच्या फायद्यासाठी ते आज या आंदोलनात येऊ शकतात. म्हणजेच संघटनेच्या आंदोलनात शेतमजुराचाही फायदा अंतर्भूत व्हायला हवा. त्यातून उद्याचा शेतकरी व शेतमजूर हा लढा थांबवण्याची सुवर्णसंधी आपल्याला लाभेल.
 माझी स्थिती अशी झाली आहे की चवथ्या, पाचव्या धड्याचा अभ्यास करून ठेवावा आणि प्रश्न येतील म्हणून वाट पाहावी; तर प्रश्न यावेत दहाव्या, बाराव्या धड्यावरचे! मी मुद्दाम पायरी पायरीने जात होतो ते अशाकरिता की शेवटी या चर्चेचा उपयोग करून इथे जमलेल्या कार्यकर्त्यांना शेतकरी संघटनेची बाजू गावोगाव जाऊन समर्थपणे मांडता येईल; म्हणून मी थोडा ढ विद्यार्थ्यासारखा हळूहळू जात होतो आणि इथे बसलेले सगळे विद्यार्थी फार हुशार आहेत. ते आधीच सर्व वाचून ठेवून प्रश्न विचारत आहेत.

 शेतकरी, शेतमजूर; बागायतदार, कोरडवाहू शेतकरी; छोटा-मोठा शेतकरी या सगळ्या संबंधीची यादी मी शेतकरी संघटनेच्या स्ट्रॅटेजीच्या विभागात मुद्दाम टाकली होती. कारण शेतकऱ्यांकडून शेतमजुरांचे आज शोषण होत आहे यात कुणालाही काडीमात्र शंका घेण्याची कारण नाही. हे शोषण का होतय? तर शेतकरी सांगू लागले की आम्हाला भाव मिळत नाही म्हणून आम्ही तुमचे शोषण करतो, तर शेतमजूर त्याला काय उत्तर देईल? तुला जर भाव मिळवता येत नसेल आणि जर तुला शेती परवडत नसेल तर तू शेती सोडून निघून जा. माझ्या कष्टाचे फळ देणे

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १५९