पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनामध्ये कोठेतरी अशी कल्पना धरली की दोन एकर, तीन एकर जमीन जरी असली तरी तो जमीनीचा मालक आणि जर का त्याच्या जमिनीवर काम करीत असेल तर तो शेतमजूर, आणि मग Workers of the world Unite याच्यात जमीन नसलेलाच मजूर फक्त येतो - यातून मग अशा तऱ्हेने फुटीचे निष्कर्ष निघू लागतात. तेव्हा त्यांनी शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये - ज्याला मी इंडिया - भारत म्हणतो, रोझा लक्झेंबुर्गने ज्याला टाऊन आणि कंट्री म्हटले आहे - अर्थातच शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणे आवश्यक ठरते. शेतकरी संघटितपणे राहिले तर उद्योगधंद्याच्या वाढीसाठी आणि समाजवादाच्या विकासासाठी लागणारा भांडवल संचय होणार नाही, असे उघड लिहिले आहे. तेव्हा जी मंडळी पोथीनिष्ठेने बोलतात त्यांच्याबद्दल मी ही फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे दोनदा नाही चारदा म्हणेन. त्याचे कारण असे आहे की शेतकरी जेव्हा एकत्र येईल तेव्हा आपली सगळी समीकरणे बदलणार आहेत, हा विचार त्यांना सहन होत नाही. शेतीमध्ये कुठेही आजच्या परिस्थितीमध्ये फायदा नाही, हा मूलभूत मुद्दा यात काही अपवादात्मक गोष्टी असू शकतात. उदा. काही एखादे नवीन प्रकारचे बियाणे आणून जर फुले काढली तर वर्ष दोन वर्ष फायदा होऊ शकतो. टोमॅटोचे नवीन बियाणे आल्यानंतर पुष्कळ शेतकऱ्यांना पुष्कळ फायदा काही वर्षे होऊन गेला. पण अशा तऱ्हेचे फायदे हे अपवादात्मक. ते नियमात बसू शकत नाहीत. तेव्हा एकदा शेती हे फायद्याचे कलम नसून तोट्याचे कलम आहे असे धरले की मग सगळीच समीकरणे बदलू लागतात. मग मजुरापेक्षा तीन एकर जमीन असणारा शेतकरी हा कमी भाग्यवान म्हणावा लागेल. कारण शेतमजुराला निदान हे तोट्याचे कलम तरी नाही. मग अल्पभूधारक पाच एकरी याला विशेष मदतीची गरज आहे आणि दहा एकराच्या शेतकऱ्याला मदतीची गरज नाही हे समीकरणही उलटे होते. ५ एकरांमध्ये जर ५०० रु. तोटा आहे तर १० एकरांमध्ये निदान ९०० रु. तोटा आहे असे आपोआपच उत्तर येते. जर शेती ही तोट्याची गोष्ट असेल तर भूमिहीनाच्या गळ्यामध्ये जमीन बांधणे हेही मूर्खपणाचे होईल, हेही त्या समीकरणावरून कळेल. कारण ज्याला आधीच काही खायला प्यायला नाही, त्याच्या गळ्यात तुम्ही एक भाकड गाय बांधून देता, किंवा पांढरा हत्ती बांधून पोसायला सांगता, असा याचा अर्थ आहे. याचा अर्थ असा की एकदा शेती फायद्याची नाही असे तुम्ही मान्य केल्यानंतर आजपर्यंत पोथीतून किंवा थोर व्यक्तींनी सांगितलेल्या विचारातून ग्रामीण भागाच्या

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १६३