पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशिक्षित शेतकऱ्यांना हा विषय
समजायला कठीण नाही कारण प्रत्येक
शेतकऱ्याला वर्षातून एकदा तरी
'उलट्यापट्टी' चा अनुभव येतो.उलटी पट्टी
म्हणजे दलालामार्फत भाजीपाल्यासारखा
शेतीमाल बाजारात पाठविल्यावर त्याच्या
किमतीची जी पट्टी येते त्यात वाहतूक,
दलाली, हमाली, पॅकिंग वगैरेंचा खर्च वजा
जाता काही शिल्लक न राहता,
शेतकऱ्यांच्याच अंगावर काही देणे राहते.
हा अनुभव ज्याला एकदा आलेला आहे.
त्याला शेतमालाच्या किमतीचा प्रश्न
समजावून देणं आणि त्यांनी तो समजावून
घेणं कठीण राहत नाही.