पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चाकाला फक्त दोन रुपये पडत होते. आज काय पडतं? आज त्याच धावेला अडीचशे रुपये पडतात. डिझेल इंजिन १० वर्षापूर्वी साधारणपणे १५०० रु. पर्यंत मिळे. आज त्याला ६००० रु. पडतात. युरियाच्या भावाचे पाहा. कोणतीही वस्तू घ्या, प्रत्येक वस्तूचे भाव कितीतरी पटींनी वाढले आहेत. मजुरीचे दर वाढलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर शेतीमालाचे भाव जवळ जवळ वाढलेलेच नाहीत गेल्या दहा वर्षांत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना फायदा झाला की तोटा?

 ■ ■

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ५५