पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेतीमालाला भाव प्रत्यक्षात मिळायला सुरुवात झाली नसताना, कांदा-ऊस आंदोलन झाल्यानंतर हवे ते भाव बांधून मिळाले नसताना शेतकरी संघटनेने आपणहून सटाण्याच्या मेळाव्यात शेतमजुरांना मजुरीचे दर वाढवून द्यावेत अशी घोषणा केली आणि आणि तिचं मोठ्या उत्साहानं स्वागत झालेलं आहे आणि त्यानंतरचा अनुभव असा की आम्ही मजुरीचा जो दर जाहीर केला होता त्याहून अधिक मजुरी प्रत्यक्षात शेतकरी देऊ लागला आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
 मग अशा तऱ्हेचे वादविवाद उपस्थित का केले जातात?

 ■ ■

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ८९