पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेतमजूर असे वाद जागते ठेवून 'फोडा-झोडा' नीतीचा अवलंब करायचा.
 (४) शेतकऱ्याविरुद्ध प्रचार करून त्यांना आपल्या मागण्या संघटितपणे मांडता येऊ नयेत अशी परिस्थिती निर्माण करणे. आज आपण साधं आंदोलन निर्माण करण्याकरता एवढं मोठं तत्त्वज्ञान मांडतो त्याचं कारणसुद्धा हेच आहे की, या प्रचारयंत्रणेला आपल्याला तोंड देता आलं पाहिजे. आम्ही नुसतं आमच्या मालाला भाव मागतो आहोत असं नाही तर यामागे एक संपूर्ण तत्त्वज्ञान आहे, विचार आहे. हे तत्त्वज्ञान, विचार सर्वसामान्य जनतेसमोर मांडता यावे हा या पुस्तकाचा हेतू आहे.
 (५) जेव्हा जेव्हा आंदोलन निर्माण होईल तेव्हा तेव्हा परिणामांची क्षिती न बाळगता कोणत्याही मार्गांनी ते तुडवून काढायचं.

 ■ ■

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ९७