पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/127

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पोटाने राबणाऱ्या दुसऱ्या कामगारापेक्षा आपल्या मालकाचेच हित जवळचे मानतो ही जाणीव मार्क्सला झाली नाही.
 त्याच्यानंतर थोड्याच वर्षात रोझा लुक्सेंबुर्गला ही जाणीव होऊ शकली; पण मार्क्सला झाली नाही. मार्क्सची तत्त्वज्ञानाची बैठक आणि जोतीबाचे जमिनीशी इमान शेतकरी संघटनेच्या रूपात एकवटायला शंभर वर्षे मध्ये जावी लागली. मार्क्सच्या कॅपिटल ग्रंथाला मुजरा नुकताच केला. आता 'शेतकऱ्याचा असूड'ला त्रिवार मुजरा.

□ ◘
शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १२२