पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/163

हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतीमालाच्या भावाचा प्रश्न कसाबसा सामावून घेण्यात आला. पूर्वी म्हटल्याप्रमाणे शेतीमालाचे भाव हे शेतकरी कामगार पक्षाचे कृत्रिमरीत्या चिकटविलेले मातीचे कुल्लेच होते.

 मार्क्सवादी म्हणविणाऱ्यांनी मार्क्सवाद का स्वीकारला असावा याचे हे मार्क्सवादी विश्लेषण आहे; पण वस्तुवादाच्या कठोर अमलातून वस्तुवादीही सुटू शकत नाहीत. वस्तुवाद्यांची खरी निष्ठा वास्तवाशी असावी लागते; कुणा पोथीशी नाही, कुणा प्रेषिताशी नाही.

 एके काळी गावोगाव उत्साही, ध्येयनिष्ठ, त्यागी कार्यकर्त्यांचे जाळे तयार करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या आजच्या शोकांतिकेचा अर्थ हा असा आहे.

□ ◘
शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १५६