या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिवस : तिसरा प्रात्यक्षिक : कलम करणे - छाट कलम, गुटी कलम, दाब कलम प्रस्तावना : वनस्पतींना जास्तीत जास्त महत्त्व प्राप्त होत गेले. आज बऱ्याच ठिकाणी लहान मोठ्या नर्सरी दिसून येतात. या नर्सरीमध्ये विविध प्रकारची झाडे असतात. ही रोपे कमी कालावधीत व चांगल्या प्रकारे जोपासलेली असतात. त्यातून उत्पन्नही जास्त मिळविता येते. अशा पद्धतीने रोपे पुढील दोन पद्धतीने करता येतात. वनस्पती प्रजनन लैंगिक अलैंगिक शाकीय अभिवृद्धी भर कलम दाब कलम उती संवर्धन गुटी कलम खोडापासून मुळापासून पानापासून (१) खोड, मूळ, पान, अशा शाकीय अवयवांपासून वनस्पतीच्या होणाऱ्या प्रजननाला शाकीय अभिवृद्धी असे म्हणतात. (२) बीजाणुंपासून होणाऱ्या प्रजनन पद्धतीला बीजाणुजन्य प्रजनन (टिश्यू कल्चर) म्हणतात. या दोन्ही पद्धतीने वनस्पतीचे प्रजनन करून रोपे तयार केली जातात. पूर्व तयारी : प्रात्यक्षिक करण्यापूर्वी प्रथम स्वतः ते प्रात्यक्षिक करून पाहून त्यात येणाऱ्या अडचणी जाणून घ्या. प्रात्यक्षिकास लागणारे साहित्य खरेदी करा. जर बाजारपेठ जवळ असेल तर मुलांना बरोबर घेऊन बाजारपेठेत जाऊन मुलांना खरेदीचा अनुभव द्या. (उदा. स्पॅगनम मॉस (शेवाळ), संजीवक, प्लॅस्टिक पिशव्या इ.) प्रात्यक्षिकाच्या पूर्वी साहित्याची जमवाजमव करून ठेवावी व पूर्ण दिवसाचे नियोजन करावे. उपक्रमांची निवड करणे :(१) बोगनवेल, डुरांडा या शोभेच्या रोपांची प्रत्येकी १०० छाट कलमाने रोपे तयार करा. (२) एखाद्या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेचे छाटकाम करून द्या. (३) एका शेतकऱ्याच्या डाळींब बागेत गुटी कलम करून द्या. (४) पारिजातकाच्या १०० रोपांना गुटी कलम करा. (५) एक छोटी नर्सरी तयार करून त्यामध्ये छाट कलमाची, गुटी कलमाची व दाब कलमाची रोपे तयार करा. (६) एका शेतकऱ्याच्या पेरुच्या बागेत दाब कलम करून द्या. अपेक्षित कौशल्ये : (१) कलमाची हत्यारे हाताळण्यास शिकणे. (२) कलमांच्या फांद्या निवडण्यास शिकणे. (३) खत, मातीचे मिश्रण करण्यास येणे. (४) छाट व्यवस्थित घेता येणे. (५) कलमे व्यवस्थित बांधणे. साहित्य : स्पॅगनम मॉस, संजीवक, प्लॅस्टिक पिशवी, प्लॅस्टिक कागद (कलम)पट्टी. साधने : सी कटर,कलमाचा चाकू इ. ११