या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृती: (अ)छाट कलम : (१) माती-शेणखत हे ३:१ प्रमाणात मिश्रण करून प्लॅस्टिक पिशवीत भरा व पाणी दया. (२) आकृतीत दाखविल्याप्रमाणे छाटे कापा. (३) छाट्याला खालील बाजूस, तिरकस बाजूस संजीवक लावा. (४) संजीवक लावलेला भाग पाणी ओतलेल्या पिशवीत रोवा. (५) छाट्याच्या वरील बाजूस शेण लावा किंवा प्लॅस्टिकने बांधून टाका. (६) पिशवीत कायमचा ओलावा राहील अशा पद्धतीने पाणी सोडा. आकृती (ब) गुटी कलम: आकृतीत दाखविल्याप्रमाणे कलमासाठी निवडलेल्या फांदीची साधारण एक ते दीड इंच लांबीची गोलाकार साल काढा. (२) साल काढलेल्या जागी संजीवक लावा. नंतर ओले केलेले स्पॅगनम मॉस त्यावर लावून प्लॅस्टिक पट्टीने तो भाग बंद करा. स्पॅगनामॉस ओले करून लावतात कारण कलम तयार होताना त्यास पाण्याची आवश्यकता असते. व ते पाणीला स्पॅग्नामॉसमधून शोषून घेते. स्पॅग्नामॉसमधील पाणी ज्यावेळी संपते त्यावेळी स्पॅगनामॉस हवेतील आर्द्रता शोषून घेते व कलमाची पाण्याची गरज त्यातून भागविली जाते म्हणून गुटी कलम करताना स्पॅग्नॉमॉस वापरतात (१, (२) (३) (४) (५) (६) (७) (८) M (क) दाब कलम: (१) माती व शेणखत यांचे ३:१ या प्रमाणात मिश्रण करून ते कुंडीत घ्या . (२) पेरूच्या झाडाची जमिनी लगतची फांदी कलमासाठी निवडा. शेंड्यापासून २ फूट मागील बाजूस फांदीची खालून १-२ इंच तिरकस काप घ्या. (४) तिरकस काप घेतलेल्या ठिकाणी नारळाची काडी घाला व त्यास संजीवक लावून तो भाग कुंडीमध्ये मातीत दाबून घ्या. (५) दाबलेल्या भागावर वजन ठेवा. (६) कुंडीत पाणी सोडा. १२