या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिवस : पाचवा प्रात्यक्षिक : जनावरांच्या शरीराच्या मापावरून वजनाचा अंदाज काढणे. प्रस्तावना : कोणत्याही जनावराचे वजन हे त्याच्या सुदृढपणाचे मापक असते. जर आपल्या गाईचे वजन तीच्या वयाच्या प्रमाणात योग्य असेल तरच ती आपणास चांगले उत्पादन देऊ शकते. म्हणून गायीचे वजन जाणन घेणे फार महत्त्वाचे असते. पूर्व तयारी : उपक्रमांची निवड : (१) शाळेजवळील एखाद्या शेतकऱ्याच्या गायीचे सूत्रानुसार वजन काढून द्या व त्याची पडताळणी करा. (२) गावातील जनावरांच्या दवाखान्यास भेट द्या व त्या ठिकाणी जनावरांचे वजन कसे काढतात ते पहा. (३) अद्ययावत जनावरांच्या गोठयास भेट देऊन तेथील पद्धत जाणून घ्या. निदेशकांनी करावयाची पूर्व तयारी - (१) जनावराच्या मालकाची पूर्व परवानगी घ्यावी. (२) त्या दिवशी जनावरे घरी आहेत का ते पहावे. (३) जनावर मारत नसल्याची खात्री करून घ्यावी. (४) पूर्वी शेतकरी जनावरांचे वजन कसे काढत समजून घ्या. (५) डॉक्टर जनावरांचे वजन कसे काढतात समजून घ्या.(६) मुलांना सी.डी. दाखवण्याची व्यवस्था करा. प्रात्यक्षिकाची पूर्व तयारी : (१) प्रात्यक्षिकास लागणारे साहित्य व साधने जमवून ठेवा. (२) प्रात्यक्षिकास लागणारा कापडी टेपपुरेसा आहे का, तो व्यवस्थित आहे का ते पहा. (३) प्रात्यक्षिकात पूर्व संदर्भ, माहिती सांगा. (४) प्रत्यक्ष कृती करून नीट समजावून सांगा. (५) मुलांना प्रात्यक्षिक करावयास द्या व नोंद ठेवायला सांगा. अपेक्षित कौशल्येः (१) जनावराचे वजन ठरवता येणे. (२) वजनातील फरक ओळखता येणे. (३) जनावर हाताळता येणे. (४) सूत्रानुसार वजन काढता येणे. (५) वजनावरून आहार ठरवणे. (६) जनावराचे मोजमाप घेणे. (७) मोजमापावरून वजन काढणे साधने : कापडी टेप, वही, पेन इ. प्राणी : गाय, म्हैस, शेळी. कृती: (१) टेपच्या साहाय्याने कोणत्याही एका जनावराच्या छातीचा घेर मोजा. (सेंटीमीटरमध्ये) (२) त्याच जनावराचे शिंगापासून माकड हाडापर्यंत अंतर मोजा. (सेंटीमीटरमध्ये) पद्धत : वस्तुमान = घनता X आकारमान – या सूत्राचा वापर करून जनावरांचे अंदाजे वजन काढण्याचे सूत्र तयार केले आहे. यामध्ये जनावराच्या छातीचा घेर व लांबी यांचा विचार करून जनावराचे आकारमान ठरवले आहे. अX अरब जनावराचे अंदाजे वजन (किलो) = - १०४०० अ = छातीचा घेर (सेंटिमीटरमध्ये), ब = दोन शिंगांच्या मध्यापासून माकडहाडापर्यंतचे अंतर (सेंटिमीटरमध्ये) निरीक्षण: अ= ............ .सेंटिमीटर ब = ............. सेंटिमीटर १९