या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ब) माती परीक्षण व खतांचा वापर. पिकांचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी खतांचे वापरास फार महत्त्व आहे. पीक पोषणास आवश्यक ती अन्नद्रव्ये जमिनीतून घेतात. यापैकी नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये पिकांना जास्त प्रमाणात लागतात. त्यामुळे जमिनीतील त्यांचे प्रमाण सतत कमी होत असते. पिकास लागणाऱ्या कोणत्या अन्नद्रव्यांची व किती प्रमाणात कमतरता आहे. हे पाहण्यासाठी म्हणजेच सुपिकता पाहण्यासाठी माती परीक्षण, पीक, पृथ:करण, जीवजंतुंची वाढ इत्यादी भौतिक, रासायनिक व जैविक परीक्षापद्धती आहेत. या परीक्षा मातीचे व वनस्पतीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करुन किंवा प्रत्यक्ष शेतातच पाहणी व प्रयोग करून घेतल्या जातात. मातीच्या नमुन्यांचे प्रयोगशाळेत साम् (पीएच), विद्राव्यक्षार, सेंद्रिय कर्ब उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यासाठी परीक्षण केले जाते. यावरून जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे व जमिन पिक वाढीसाठी चांगली आहे. किंवा नाही हे समजते याशिवाय माती परीक्षण व पिक उत्पादन यांचे संबंधावरून पिकांना जमिनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात व खतातून किती प्रमाणात अन्नद्रव्ये द्यावयास पाहिजेत ही माहिती मिळते. परिक्षणासाठी मातीचा नमुना घेण्याची पद्धत : नमुना घेताना मातीच्या पृष्ठभागावरील काडीकचरा बाजूला करून एका शेतातील सुमारे १५ ठिकाणाहून (१५ सें.मी. किंवा ६ इंच) खोलीपर्यंतचा मातीचा थर थोळा करावा. खुरपे किंवा फावडे यांचा उपयोग करावयाचा असेल तर V या आकाराचा १५ सें.मी. खोलीचा एक खड्डा करावा. या खड्ड्यातील एका बाजूची सारख्या जाडीची माती १७.३ मध्ये दाखविल्याप्रमाणे वरपासून खालपर्यंत आकृती खुरपी किंवा फावड्याच्या सहाय्याने घ्यावी. प्रत्येक ठिकाणाहून साधारणपणे अर्धा ते एक किलो मातीचा नमुना घ्यावा. प्रत्येक विभागातून सुमारे १५ ठिकाणचे मातीचे नमुने घेऊन ते स्वच्छ पोत्यावर किंवा घमेल्यात ठेवावेत. मातीतील काडी कचरा काढून ती चांगली एकत्र करावी. या सर्व मातीचे सारखे चार भाग करून समोरासमोरचे दोन भाग घ्यावेत. हे दोन भाग चांगले एकत्र मिसळून त्यांचे परत चार भाग करावेत व समोरासमोरचे दोन भाग घ्यावेत. असे शेवटी अंदाजे अर्धा किलो माती मिळेपर्यंत करावे व ती माती प्रातिनिधिक नमुना म्हणून एका स्वच्छ कापडाच्या पिशवीत भरावी. माती परीक्षणावरून खत शिफारशी : जमिनीतील नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण व पिकांना लागणारी अन्नद्रव्यांची गरज पाहून खतमात्रा सुचवितात. मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी, मध्यम व जास्त या वर्गवारीत केले जात आहे. अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण अत्यंत कमी असल्याने खतमात्रा ५०% नी वाढवावी. कमी असल्यास २५% नी वाढवावी, मध्यम व थोडेसे जास्त असल्यास मात्रेत बदल केला जात नाही. अन्नद्रव्ये जेव्हा जमिनीत जास्त असतात, तेव्हा खतमात्रा २५% कमी करतात व जेव्हा अत्यंत जास्त असतात तेव्हा ५०% नी कमी करतात. | वर्गीकरण सेंद्रिय कर्ब (%) उपलब्ध स्फुरद(पी.) (कि./t.) उपलब्ध पालाश(पी.) (कि./हे.) उपलब्ध नत्र अत्यंत कमी ०.२० पेक्षा कमी १० पेक्षा कमी १०० पेक्षा कमी १४० पेक्षा कमी कमी ०.२१-०.४० ११-२० १०१-१५० १४१ ते २८० मध्यम ०.४१-०.६० २१-३० १५१-२०० २८१ ते ४२० २९