या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिवस : तिसरा - प्रात्यक्षिक : जलसिंचन पद्धती प्रस्तावना : भारत हा शेतीप्रधान देश असून शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून जवळ जवळ ७०% लोक शेती व शेतीशी निगडित व्यवसायाशी निगडित आहे. भारतातील अन्नधान्य उत्पादनात हरितक्रांतीमुळे आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. यामध्ये सर्वात जास्त महत्त्व हे पाणी पुरवठयास/जलसिंचनास आहे. पाणी पुरवठ्याचा हेतू किंवा उद्देश : (१) पिकांना आवश्यक असणारी आर्द्रता पुरविणे. (२) पिकांना आवश्यक अन्नपुरवठा करणे. (३) जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजण्यास मदत पुरवणे. जलसिंचन पद्धती पृष्ठभागावरून उंचीवरून जमिनीखालून गाडलेल्या नळ्यांमधून मोकाट पाणी सोडणे पाट करून देणे ठिबक सिंचन तुषार पद्धत सरी वरंबा पद्धत वाफे पद्धत आळे पद्धत वरील विविध प्रकारच्या सिंचन पद्धती आहेत. तेव्हा आज आपण ठिबक सिंचनाविषयी माहिती पाहू. पूर्वतयारी : निदेशकाने करावयाची पूर्वतयारी: (१) ठिबक सिंचन ज्या शेतकऱ्याच्या शेतात केले आहे त्या शेतकऱ्याच्या मुलाखतीसाठी पूर्व परवानगी घ्या. (२) ठिबक सिंचन विषयीची माहितीसाठी एखाद्या प्रगतिशील शेतकऱ्याच्या मुलाखतीस पूर्व परवानगी घ्या. (३) ठिबक सिंचन विषयी विचारावयाच्या प्रश्नांविषयी यादी तयार करून ठेवा. प्रात्यक्षिकाची पूर्वतयारी : (१) प्रात्यक्षिकास लागणारे साहित्य जमा करून ठेवा. (२) सर्व साहित्य असल्याची खात्री करून घ्या. (३) केशनलिका, एम-सील इ. साहित्य खरेदी करा. (४) ठिबक सिंचन,तुषार सिंचन याविषयी सीडी दाखवा. (५) मुलांचे तीन गट करा. उपक्रमांची निवड : (१) जवळील शेतकऱ्याच्या शेतातील ठिबक सिंचन पद्धतीची माहिती जाणून घ्या. (२) एक एकर जमिनीसाठी लागणाऱ्या ठिबक सिंचन पद्धतीस किती खर्च येतो याचे अंदाजपत्रक तयार करा. (३) शाळेच्या आवारातील झाडांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची सोय करा. (४) एका वयाच्या दोन रोपांना /झाडांना मोकाट पद्धतीने व ठिबक पद्धतीने पाणी देऊन त्यांच्या वाढीतील फरक काही दिवसांनी पहा. अपेक्षित कौशल्य : (१) ठिबक सिंचन पद्धतीने पिकांना पाणी देता येणे. (२) झाडांना लागणाऱ्या पाण्याचे मोजमाप करता येणे. (३) सिंचनाच्या विविध पद्धतींची माहिती घेता येणे. (४) सिंचन पद्धतीचेफायदे-तोटेप्रत्यक्ष कामातून अभ्यासणे (५) ठिबक सिंचन संच जोडता येणे. (६) ठिबक संचाची देखभाल करता येणे.