या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुस्तकाविषयी..... १. शेती आणि पशुपालन यांकडे एक विषय म्हणून पाहताना पर्यावरणाचे महत्त्व जपणे, २. प्रश्न, प्रयोगाच्या माध्यमातून काम. ३. पशुपालनाचे आर्थिक गणित, शेती-पशुपालनातील जोडधंद्यांचे व्यवस्थापन या आणि अशा विषयांचा, पूर्ण प्रक्रियेचा भाग म्हणून अंतर्भाव. कार्यक्रमाकडून असणाऱ्या अपेक्षा : १. हाताने काम करत शिक्षण घेणे. २. तंत्रज्ञानविषयक शिक्षण हे समाजाच्या गरजा, प्रश्न यांवर ___ आधारित ठेवणे. ३. एखाद्या कामाची गरज, परिणाम, आखणी यांपासून ते खरेदी-विक्री, जमा-खर्च असे सर्व टप्पे शिक्षणात अंतर्भूत करणे. ४. शिक्षणात सामाजिक, आर्थिक अशा कोणत्याही भेदांना वाव न ठेवणे. ५. 'सर्वच विषय एकमेकांना जोडलेले असतात' या तत्त्वावर आधारित शिक्षण प्रक्रिया ठेवणे. ६. कोणताही विषय, कुठलीही संकल्पना सहज-सुलभ करून विद्यार्थ्यांपर्यंत, पर्यायाने समाजापर्यंत पोहोचवणे. ७. मन, मनगट आणि मेंदू यांच्या विकास प्रक्रियेतल्या __परस्पर संबंधानुसार शिक्षण प्रक्रियेची आखणी करणे. ८. कार्यक्रमाची आखणी करताना शाळा-समाज यांच्या भूमिका परस्परांना पूरक ठेवणे. - भारतीय शिक्षण संस्था संचालित, विज्ञान आश्रम पाबळ. ता.शिरुर, जि.पुणे ४१२४०३. फोन : ०२१३८-२९२३२६ e-mail : vapabal@gmail.com, www.vigyanashram.com, www.liepune.org Samarth Media Center, Pune Ph-66027359, 22 Feb 2012