या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकोपयोगी सेवा : (१) शेतात कोथिंबिरीचे पीक घेऊन काळजी घेणे व ते पीक काढून बाजारात विक्री करणे. (२) पालक, मेथी, शेपू इ. भाज्यांचे उत्पन्न घेऊन विक्री करणे. (३) शेतकऱ्यांस बीजप्रक्रिया करून देणे व पैसे घेणे. (४) शेतकऱ्यास एखाद्या पिकाची लागवड करून देणे व पैसे घेणे. संदर्भ : (१) सामान्य विज्ञान, इ. ५ वी, प्रकरण ७ - नैसर्गिक साधनसंपत्ती,पान नं.५६, घटक-माती, प्रकाशन २००६. (२) भूगोल, इ. ५ वी, प्रकरण१६-मानवी व्यवसाय,पान नं.४१-४३,घटक-शेती,प्रकाशन २००७.(३) सामान्य विज्ञान, इ. ७ वी, प्रकरण ९ - मातीचे गुणधर्म,पान नं.६९-७४, जमीन व माती, प्रकाशन २००५, प्रकरण १० - वनस्पती संवर्धन आणि शेती मशागत, पान नं.७७-८४, घटक - शेती काम, प्रकाशन २००५. (४) भारत – प्राकृतिक पर्यावरण, इ. ९ वी, प्रकरण ६, मृदा, पान नं.३६-३९, प्रकाशन २००६. (५) भारत - मानवी पर्यावरण, इ. १० वी, प्रकरण ६, भूमी - संसाधने, पान नं. २१-२६, घटक - शेती, प्रकाशन - २००७. दिवस : दुसरा । प्रात्यक्षिक : कीड ओळखणे व तिचे मोजमाप करणे, प्रस्तावना : आपला देश हा कृषी प्रधान देश असून या देशातील ७०% लोकसंख्या शेतीवर व शेतीस पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु आता या व्यवसायास मात्र ग्रहण लागले असून शेतीवर अनेक संकटे येऊ पाहात आहेत. त्यामध्ये अवेळी पडणारा पाऊस, खतांची कमतरता, पिकांचे वाढते नवनवीन रोग इत्यादी तर आज आपण पिकांवर पडणाऱ्या विविध किडी ओळखणे व तिचे मोजमाप कसे करतात हे पाहूया. तत्पूर्वी आपण कीड नियंत्रणाविषयी माहिती पाहूया. आपल्या पिकांचे नुकसान करणारा कोणताही जीव म्हणजे किड होय. उदा. किटक, कोळी, जीवाणु (बॅक्टेरीया, बुरशी, सुत्रकृमी इ.) उंदीर, घुशी, माकडे इ. [१. ज्या प्राण्याला ६ किंवा ३ पायांच्या जोड्या असतात त्याला किटक असे म्हणतात. उदा. मावा, तुडतुडे, झुरळ इ. २. कोळी (स्पायडर) या प्राण्याला ८ पाय किंवा ४ पायांच्या जोड्या असल्याने त्याला किटक म्हणता येणार नाही.] पिक नुकसानीस कारणीभूत घटक कीटक बुरशी (जीवाणू) व्हायरस कोळी उंदीर, घूस, माकड,शेळी इ. कीटकांचे प्रकार : (अ) (१) चघळणारे - अळी वगैरे - स्पर्श / बायगत विष (२) शोषणारे - मावा, थ्रिप वगैरे, अंतर्गत विष (३) मुळे, खोड पोखरणारे - बहुदा मातीतील किटक (ब) बुरशी : जास्त आर्द्रता असते तेव्हा वाढतात. नवीन पेरलेल्या बियांना धोका. (क) जीवाणू : विषाणूंपासून - संसर्गिक, पानावर गुठळ्या येतात. पाने जळतात इ.