या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. निकाल केला. म्हातारपणी आजाआजीला सोडून गेला कोणीकडे उधळून. आतां पुनः आला तों आजाआजी गटकाऊन टाकली. तेच आतां फकीर होऊन आले असतील, म्हणून ब्राम्हणांच्या अगोदर जे आहे ते त्यांना भोजनास घातले. दुसरे काय ! म्हणतो काय की, सगळे जग जनार्दनस्वरूपीच आहे. क्षुधिताला अन्नदान करण्यासारखें महाव्रत नाही. त्यांच्या कुडीत तरी परमेश्वराचा अंश आहेच. तो भुकेने व्याकुळ झाला होता. तुमचा अजून व्याकुळ झालेला नाही. असले फाजीलपणाचे आणखी चावटपणाचे भाषण ऐकून माझी तळव्याची आग मस्तकाला गेली होती. ( रागानें ) आणखी ते फकीर आमच्या देखत विडे चावीत बाहेर पडले. भ्रष्टाकार ! वर्णसंकर!। (राण्या महार व एकनाथ बोलत बोलत प्रवेश करितात.) पिय-अग बया बया, मेलों मेलों मेलों ! एकनाथ-अरेरे ! हे कोणाचें पोर तापलेल्या वाळूत व्याकुळ होऊन रडत आहे ? या बाम्हणमंडळींना हे दिसलें नाहीं काय ? किंवा याचे रडे त्यांच्या कानांवरच गेलें नाहीं काय ! सर्व जग जर जनार्दनस्वरूपी आहे तर हे पोर कोणाचें का असेना, याला आपण कडेवर घ्यावें. ( मुलाला कडेवर घेऊन समजावितो. त्याची लाळ पुसतो. )उगा बाळ, रडूं नको अं ! राण्या, या मुलाला खाऊ आण जा. (पैसे देतो.) रडूं नको बाळ, तुला तुझ्या आईकडेस पावतें करतो. तुझें नांव काय बेटा ! पिया पिया. माझी आई म्हंगाली, हत बैस मी नाथाच्या पाया पडूनशान येते. मंग ती गेली कुनीकडे निघूनशान आन मी हत रडत बसलोया. एकनाथ—तुझ्या बापाचें नांव कायरे ! पिया-बाबा. ( राण्या प्रवेश करितो.) राण्या-महाराज, ते महाराच मुल है. त्याच्या बाच नांव गेननाईक आळसकर. आता त्याला त्याच्या आईकडे पोहचते करतो. ( एकनाथ मुलाच्या तोंडांत पेढा घालतो. त्याचे तोंड कुरवाळतो. राण्याजवळ देतो.) महाराज, भगवंतांनी जव्हा इस्वरूप अर्जुनाला दावल, तव्हा बामन कुठ होत, आन माझ्यासारखा महार कुठ होता ?