या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याजवर शिंदे. सरकारचा हक्क आहे, हे दाखविण्याकरिता किल्ल्यावर त्यांचे निशाण होते. पुढे इ. स. १८८६ साली शिंदे सरकारचे झांशी वगैरे प्रांत इंग्रजसरकारांनी आपणा-कडे घेऊन त्यांच्या मोबदला हा किल्ला व मुरार छावणी -श्री. जयाजीराव महाराज शिंदे ह्यांना परत दिली. तेव्हांपा. सून हा किल्ला पूर्ण स्वामित्वाने शिंदे. सरकारांकडे आहे. या किल्ल्यावर इंग्रज सरकारांनी आपली सोल्जर्स लोकांची पायदळ पलटणे राहण्याकरितां, मोठमोठ्या इंग्लिश पद्धतीच्या इमारती बांधिलेल्या हली कायम असून, त्यांत शिंदे सरकारची काही फौज राहत आहे, व बाकांची फौज मुरार छावणीत राहत आहे. या किल्ल्यास हल्ली उत्तरेस ग्वाल्हेर दरवाजा, दक्षिणेस लष्कर दरवाजा, व पश्चिमेस बुधगांव दरवाजा. असे तीन असोन, पहिल्या दोन दरवाजांनी किल्ल्यांत जाण्यायेण्याबद्दल कायदा ठरलेला आहे, व तिसरा दरवाजा, बऱ्याच वर्षीपासून बंद केला असून, तो न उघडण्याविषयी त्याजवर शपथपूर्वक लेख लिहिला आहे; असें ह्मणतात. ह्या किल्ल्यावर जैन लोकांच्या पारसनाथ देवाच्या विशाळ मति डोंगर कोरून बनविलेल्या,व त्या लोकांची देवळे,हल्ली कायम आहेत. तरी याजवरून ह्या किल्ल्यावर जैन लोकांचे राज्य मागे झाले होते, हे स्पष्ट होते. ह्या किल्ल्यावर पीरस्थान, हिंदु देवस्थान, जैनदेवस्थान, अशा निरनिराळ्या धर्माची देवळे अस. ल्याने याजवर एकप्रकारची चित्र विचित्र शोभायुक्त भूमि