पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/111

हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून 'माणूस प्रतिष्ठान'चे काम येथे सुरू करण्यात आले. परंतु कामामागील भूमिकेचा व्यवस्थित प्रचार अगाऊ झाला नाही. धर्मार्थ काम अशीच कामावरच्या मजुरांची, ज्या छोट्या शेतकऱ्याच्या शेतात विहीर खणली जात होती त्याची व ज्या आसपासच्या दोन-चार शेतकऱ्यांना विहिरीचे पाणी दिले जाणार होते त्यांची भावना होऊन बसली. काम चालू झाल्यावर, ज्यांची खूप शेतीवाडी आहे व पैसांही ज्यांच्याजवळ कमी नाही, अशांनीही नवीन विहिरींसाठी हात पसरला. हा एक चीड आणणारा अनुभव होता. मजुरीत वाढ व्हावी अशा मागण्या मजुरांकडून वरचेवर पुढे येत होत्याच. मालकही जादा मजुरी जिकडे मिळेल तिकडे अधूनमधून जात होता. सामुदायिक पुरुषार्थाची भावना निर्माण होऊ शकली नाही. स्वावलंबी होण्याची धडपड चाल झाली नाही. भंडारी होते तोवर कामामागील हा विचार निदान सांगितला तरी जात होता. पुढे उद्योगानिमित्त त्यांनीही स्थलांतर केले. त्यामुळे विहीर जरी कायम राहिली व तिचे पाणी जरी वापरले गेले तरी तिच्या मागील विचार, भावना पुसली गेली. नुकतेच भंडारी तिकडे गेले होते. त्यांनी पत्रातून वस्तुस्थिती कळवली आहे. आपल्या सर्वच ग्रामीण भागावर सध्या भिकाऱ्या रोगाची साथ कशी पसरत आहे याचे मोठे विदारक चित्र त्यांनी रेखाटले आहे. भंडारींनी पत्रात लिहिले होते-

सुप्याला एका छोटेसे काम सुरू करताना केवढ्या मोठ्या आशा उराशी बाळगल्या होत्या. गेल्या दोन वर्षात देशाचे राजकीय, सामाजिक चित्र बदलले आहे. एक फसवे मृगजळ सर्वत्र पसरत चालले आहे. मधल्या काळात खूप पाणी वाहून गेले. अनेकांचे बुरखे फाटले. काहींनी नवे धारण केले. एक गतिमान संभ्रम, भरकटणे, फार तर फरपटणे म्हणा हवे तर, सुरू आहे. माझ्याही जीवनात गाडीने रूळ बदलले आहेत. पण .

शेजारीच पडलेल्या वृत्तपत्रातील मजकुरामुळे मी आज पूर्वीसारखाच अस्वस्थ आहे. कुठेतरी आमच्या स्वाभिमानाला खग्रास ग्रहण लागले आहे. ते वृत्त म्हणते, त्याचा भावार्थ तरी असा आहे-आम्हाला पी. एल. ४८० चे एखाद्या गुंगी आणणाऱ्या औषधासारखे व्यसन जडले आहे. करारामागून करार आपण करीत आहोत. अमेरिकेतून वस्तू आयात करण्याची आम्हाला सवय जडली आहे. आपण १९६८ च्या डिसेंबरमध्ये एक करार केला. २.३ लाख टन गहू मागविला. त्यापेक्षा थोडा लहान करार एप्रिल १९६९ मध्ये केला. वस्तूंच्या संख्येतही आता वाढ होऊ लागली आहे. नुकताच आणखी एक करार तीन लाख टन गहू, ४९,००० टन खाद्य तेल आणि १००,००० कापडांच्या गाठी आपण मागवीत आहोत. या सर्व मालाची किमत आहे १४३.६३ कोटी. या सर्वांचा अर्थ एकच आहे. तो म्हणजे अधिक गुलामी. अधिक आर्थिक पारतंत्र्य.

। १०४ ।