पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/10

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ प्रस्तावना.
कांत कोणते प्रसंग वय असले पाहिजेत असे वारकरी, वैष्णव व आधुनिक विद्वान यांचे मत आहे, त्याची फोड त्यांनी मला करून देऊन अशा महात्म्यांच्या नाटकरचनेची योग्य दिशा त्यांनी मला । दाखवून दिली. तसेच श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या चरित्रांतील निरनिराळे प्रसंग नाटकांत गोवतांना त्यांची जुळणी करून घेण्याकरितां क्वचित ठिकाणी त्यांच्या क्रमांत आलटापालट करणे किंवा त्यांत कमीजास्त करणे मला जरूर वाटलें, तसा फरक कोणत्या रितीने केला असतां, अशा नाटकाचा मुख्य हेतु जो भगवद्भक्तिमार्गाचा प्रसार तो विशेष प्रकाराने साध्य होईल हेही त्यांनी मला सुचविले. तात्पर्य हे नाटक लिहिण्याचे काम त्यांचे मला थोर साह्य झाले असून या त्यांच्या साह्याबद्ल मी त्यांचा फार आभारी आहे. सुप्रसिद्ध नाट्यकलाभिज्ञ शाहूनगरवासी नाटकमंडळींनी हे नाटक लिहिण्यास मला मुद्दाम सांगून जें प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. अशा विस्तृत चरित्रात्मक नाटकाची रंगभूमीच्या सोईकरितां निराळी रंगावृत्ति करणे जरूर असल्यामुळे, ह्या नाटकाचीही तशी निराळी रंगावृत्ति मी केली असून, ती करण्याचे काम शाहूनगरवासी नाटकमंडळीच्या नाट्यशास्त्रज्ञानाचे मला जे साह्य मिळालें, त्याबद्वलही मी त्यांचा फार आभारी आहे. | या पुस्तकाच्या छपाईचे कान काळजीपूर्वक व मनासारखे करून दिल्याबद्दल आर्यभूषणछापखान्याच्या व्यवस्थापकांचाही मी आभारी आहे. शेवटी ज्यांच्या प्रसादामुळेच मजसारख्या अनधिकारी व अल्पबुद्धि पामराकडून ही वेडीवाकडी चार अक्षरे लिहिली गेली, त्या परात्परजगद्गुरु श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे चरणावर पूर्णभक्तियुक्त अंतःकरणाने त्रिवार मस्तक ठेवून, प्रस्तावनेदाखल लिहिलेले हे दोन शब्द मी पुरे करतो. | मुक्काम पुणे, सदाशिव पेठ, १ विनायक त्रिंबक मोडक कार्तिक शुद्ध ११ शके १८२६. । पुस्तककर्ता,