पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/100

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९० ' श्रीज्ञानेश्वरमहाराज. प्रवेश तिसरा. स्थळ-अलंकापूर. ( हरिबा कुंभाराचें घर. हरबा कुंभार हातांत वीणा व चिपळ्या घेऊन भजन करीत प्रवेश करतो.) हरिबाबोला इट्टल इट्टल रे पांडुरंग इट्टङ ॥ बोला । ध्रु० ॥ आपुत सोयरे जनु कावळे जमल्यात भोतीं तुझ्या बापा । टोचून टोचून घेत्याल मंग बा धायधाय रडशील रे ॥पांडु०॥ जमीन जुमला ल्योक बाईल माझी माझी तू ह्मनसी ।। परान जाईल तवा कोनबा, तुझ्या सांगती येईल रे ॥पांडु०॥ बाग वाडा हथ ठिवुनशान् नेत्याल तुजबा यमपुरीं । पोरंबाळं घेत्याल बाढून, ह्मोतुर लाविल बाईल रे ॥ पांडु० ॥ आजे पनजे काका मामा गेले त्येची न्हाई गनती। त्येच्या मागं तूंवी जाशील, यर्थ भोगुनी हाल रे ॥ पांडु० ॥ जनमपातर तरास सोसुनी कमाई केली पैक्याची । मौजेदी येळ काढला, भोगुनी नाना ख्याल रे ॥ पांडु० ॥ ( इतक्यांत हरियाची बायको जानकाई प्रवेश करते.) जानकाई- कारभारी ! अव कारभारी ! कारभारी अ ! कान फुटल की ऐकाया येतया ? अवो, गन्या ह्मनत व्हता की त्यो दोड इसौवा चाटी अकशी लाल व्हऊन गेलाया म्हनून ! " आपनास दंडाला धरून घराभाहीर वढनार ! आन् समद डाग - डागानं, चिरगट कांबसणं, मडकी गाडगी, ढोर गाढव, हाच " """नार आपल्या घरला व्हाऊन ! तवा म्होर कसा इचार करनार ? मी तवा ह्मनत व्हये की. कारभारी नगा बरं, त्या मुक्ताला नगा रखापरं देऊ झनन ! मी तवा तुमच्या म्होरं आडवा बां झाये । पन आपन तवा माझ न्हाई ऐकलं ! आता जना" ची झाग व्हन्याची आलीया येळ ! तमी तर ह्य असे खूळ ०. । कथा ! तवा आता माझी चार कच्चीबच्ची ल्यावानी लागलासा कराया ! तवा आता माई