पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/101

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. घेऊनशान म्या कुनाच्या दाराम्होरं जाव ! न्हाई आई-का न्हाई बा-का न्हाई भाऊ-का न्हाई भहीन-संमदा उन्हाळा झालाया ! तवा आतां कुनाम्होरं दात इचकूनशान पोटाला टुकडा मागावा ? हरिबाअग इट्टल आपला मायबाप त्यो पंढरींत हाये ।। संता संग तथं जाऊं चल, अन्नपानी देईल ग ।। पांडु० ॥ जानकाई- इडल काय देनार ! चंद्रभागतल गोट व्हय ! मातीत गाडा नेऊनशानं ह्ये शास्तार ! त्यो इसोवा हथ येऊनशानी जवा पोराबाळासनी मारहान करील, त्येना फरारा वढील, आन् तुमाआमासनी काढन्यानं जखडील, तवांच थंड व्हत्याल तुमच डोळ ! कठीन ! लै कठीन वखत आलाया ! | हरिया अग कारभारनी तू हायेस येडी गुरु आह्मा पाठी। तिरभुवनामधीं हात कुनाचा, आह्मावरती वाहील ग ॥पांडु॥ अग गुरुची करनी थोर हाये ऐकलीस कानी । त्येच सुमरन कर ग येडे, समद दुःख जाईल ग ॥ पांडु० ॥ ( इतक्यांत गण्या मोठ्याने हासत प्रवेश करतो ) गण्या -( पोट धर धरून हातात ) ही ! हा! ही ! ही ! लै, लै, गमात झालीया पगा ! बाबा, बाबा ! चला ! बिगी बिगी चला ! अक्शी गमात पन गमात हाये ! ल्येकाचा वाचावानी डुरकत व्हता न्हव ! आं ! पन आतां अक्शी गाय व्हऊन गेलाया ! जानकाई- ( गण्यास पोटाशी धरून ) गन्या, अरे गन्या, अरे हाय तरी काय ? आं ! तुसनी हासन लै लै लोटलया ! म्हंजी असं झालय तरी काय ? अ ! का येंच्यावानी तुला बी झपाटलं कुनी भुतानं ! गण्या- ( मोठ्याने हांसून ) ही ! ही ! ही ! अग त्यो मुरदाड इसोबा चाटी ! जानकाई- ( आनंदाने ) बर मग ! त्येचं काय ? त्येचा मुडदा पगितलास व्हय ? त्येला न्येला का मरीआइनं वढ्न ? . गण्या- अग तस न्हव ! ग्यानुबाह्माराजांच्या म्होरं, त्यो दंडव