पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/102

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ श्रीज्ञानेश्वर महाराज. तामाग दंडवत, दंडवतामाग दंडवत घालतुया ! आन् समदा गांव लोटला हाये पग ती गमात पगाया ! अक्शी तोबा उल्डा हाये, पग तोबा ! | जान काई-आं ! आन ह्ये इखाच अर्मुत ! कसं झालं कसं ह्य ! इसोबा म्हंजी समद्या गावाची खट ! आन् त्यो ग्यानुबाझाराजांना सरन कसा गेला ? हरिबा- अग कारभारनी, लोटांगन पग संतापाईं त्येनं घातलं भक्तीनं ।। झनुन इखाचं अर्मुत झालं, यांत कोनतं नवल ग॥पांडु०॥ गण्या- व्हय, व्हय, व्हय! ह्ये अक्शी खर हाय पग ! अग त्या मुक्तीला इसोबासनी फसवूशान् बाबांनी खापरं दिली न्हव ? ती घेऊनशा मुक्ती वाटेनं बेगुमान जात व्हती. तिकत्यामंदी त्यो इसोबा आला तकडूनशान्, आन् मुक्तीला पगून पल्डा तिच्यावर रानडुकरावानी तुटून ! आन मुक्तीला शिईगाळ करून त्येनं त्या खापरांचा लाथेनं चकाचूर केला ! आन् मुक्तीच्या तोडांत मारून शेनी कसं लागला म्हनाया, मांडं करत्येस न्हव १ कर मांड! रांडे कर मांडं ! तवा ती मुक्ती रडत वरडत गेली आपल्या घरला ! म्होरं काय गमात व्हतीया त्ये पगाव ह्मणून इसोबाबी गेला तिच्या माग लपत छपत ! आन् ग्यानुबाम्हाराजांच्या मठाभाहीर उभा न्हाऊन दाराच्या फटीमधून आंत काय व्हतया त्ये लागला हळूच पगाया ! जानकाई- त्यो तसाच हाये मेला मुरदाड ! बरम राकुस हाये ! मेला बरम राकुस ! गण्या- मुक्ती रडत वरडत आली ह्ये ग्यानुबा ह्माराजांनी पगितलं, तवा त्येनी तिला पोटाशी धरली, आन् तुला कुनी काय केलं, झनून इचारलं, तवां मुक्तीनं समदा परकार सांगितला. त्यो ऐकूनशी ग्यानुबा म्हाराज कसं ह्मनालं ? मुक्ते तू नग रहूँ ! मांड्याचं पीठ भिजव ! आन् मांडं करून भाज माझ्या पाठीवर ! ! जानकाई- काय ! पाठीवर मांडं भाज असं ह्मनाल ? गण्या- अग व्हय, व्हय ! ये जवा इसाबानं ऐकलं तवा त्योबी तुझ्यावानीच गेला गोंधळून ! अन् ह्यो गारुडी कावा है।