पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/103

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( अंक ३ रा. ९३ तरी काय, ह्ये पगन्यापाई बसला तथच दडून ! इस्तवाबिगर मांड व्हनार कस ! असा इसोबा इचार करतुया, तिकत्यामंदी मुक्तीन पीठ भिजवूनशान केलं मांडं. तवा ग्यानुबाह्माराज झाल ओणव. आन् तोंडाभाहीर जाळ काढून, पाठ, पोट, आन् समद आंग, केलं त्येनी वनवा पेटल्यावानी लाल गंज ! तवा मुक्ती लागली त्येंच्या पाठीवर एका म्होर एक मांडे टाकून भरारा भाजाया ! आन हूं काय ? मुक्तीनं खिनामंदी मांड्यांचा ढीग पाल्डा पग ढीग ! जानकाई- कारभारी ! अबो कारभारी ! ऐकलं काय गन्या काय सांगतुया त्ये ! ग्यानुबांनीं गारुड्याच्या बाच्यावर तान केली न्हव ह्मनायची ही ! असा परकार म्या समया जल्मांत न्हाई पगितला, का न्हाई कदी ऐकला ! हारिबा- अग येडे, ज्ञानेस्वरम्हाराजासनी गारुडी नग झनू ग ! अग ज्ञानेस्वर हे देव हैती इसोबासनी नव्हत ठावं ।। त्येची परचित दावायाला, आगीनरूप घेतलं ग ॥ पांडु०॥ गण्या-आईग, तवां कन। त्यो इचितर परकार पगून इसोवाची सुधबुध न्हाईसी झाली ! आन् त्येच्या डोळ्याम्होर चकर येऊन, त्यो डोळे मिटून सवस्थ बसला ! हकड निरवर्तीनाथ, ग्यानुबाम्हाराज, सोपानदेव आन मुक्ती ह्येनी घेतली थाळी वाढूनशान, आन् बसलीं मांडं खायाला ! इळभरानं इसोबा आला सुद्धीवर, आन् त्येनं जवा त्या समयासनी मांडं खातांना पगितलं, तवां त्येच्या आंगामंदी संचार व्हऊन, त्यो मठाचं दार फोडून घुसला तडक आंत ! अन् ग्यानुबाम्हाराजांच्या ह्मोरची थाळी घेऊन, लागला बरम राकुसावानी वका बका बका मांडे खायाला ! तवां ग्यानुबाह्माराज इसोबाला कसं ह्मनाल ? अर ह्यो खेचर ! ह्यो खेचर ! है कोन ? त्ये सबुद इसोबान ऐकल, आन् त्येसनी काय वाटलं कोन जानं, त्येनं ठेवली ग्यानुबाम्हाराजांच्या पायांवर डोई ! आन् तुमी माझ माबाप हैसा ! तुमी देव हैसा ! माझं रक्सन करा ! मला उपदेस क़रा ! मला मो