पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/104

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'९४ श्रीज्ञानेश्वरमहाराज. क्साला धाडा ! असं लागला चळ भरल्यावानी बकाया ! तवा ग्यानुबाह्माराजांनी त्येच्यावर दया करुन ठिवला त्येच्या डोक्शावर हात । त्येनं इसोबाला झालं ग्यान ! आन् त्यो आतां मला घर नग ! मला दार नग ! मला बायकु नग ! पोर नग ! बाळ नग ! कुनी नग ! अस लागलाया ह्मनाया ! त्येची बायकु, पोर, आन् आपुत सोयरे, समदे ग्यानुबाह्माराजांच्या मठामंदी जमा झाल्याती ! अन् इसोबाची समजूत पाडन्यापाई लै वाटकुळ शीन करत्याती ! पन इसोबा आतां कुनाच्या बाचं बी ऐकत न्हाई ! आन तोंडानं इठ्ठल ! इद्दल ! इडल ! ह्मनतुया ! हरिबा-अहाहा ! ज्ञानेस्वरह्माराज असाच परसाद तुमी या हरिबावर कदी कराल बरं ? म्हंजी या परपंचामधून माझीबी त्या इसोबावानीच सोडवनुक व्हईल ! अग कारभारनी अग देवाला कदी सरन जाऊनी न्हाई केलं पूजन भजन । परपंचाची हौस धरून पग, डोई वाहिले हेल ग ॥ पांडु० ॥ दो दीसाचा जनम खोटा उमगुनी घेई तू ध्येनी । खिनभर संतापाई लागसी, सुद्ध बुद्धी व्हईल ग ॥ पांडु० ॥ नामघोस हा मंतर त्येंचा शिकवित्याल तुज पेरमानं ।। त्यो घोकुन तु पाक मनानं, वैकुंठीं जासील ग ॥ पांडु० ।। अग म्या ज्ञानेस्वरच्या पाई डोई ठेवून घेतला उपदेस । त्येनं मला ध्येनं लाविलं, पांडुरंग इठ्ठल ग ॥ पांडु० ॥ अग चलेग जाऊं भाव भक्तीनं घेऊं चरनावरी लोळन । बोधाचा मळवट कपाळी, तुझ्या सद्गुरु भरत्याल ग॥ पांडु०।। ( सर्व निघून जातात.)