पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/106

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६ श्रीज्ञानेश्वर महाराज. हरीएक ॥ २॥ रामहरिसारजिव्हाहनामाची ॥ उपमा त्यांदैवाचीकोणवानी ॥ ३ ॥ ज्ञानदेवासांगझालानाम: पाठ ॥ पूर्वजांवैकुंठमार्गसोपा ॥ ४ ॥ मुक्ताबाई-दादा ज्ञानराया, हे कायहो नवल, की हे सर्व आकाश मेघडंबराने व्याप्त झाल्याप्रमाणे एकाएकीं काळेभोर दिस्वं लागलें ! ज्ञानेश्वर- बाळ मुक्ताबाई, आपण पाठविलेल्या उत्तराचा अर्थ योगीश्रेष्ठ चांगदेवांना न समजल्यामुळे त्याचा उलगडा अन घेण्याकरितां ते चौदाशें शिष्यांसह योगबळाने आकाशपंथें इकडे येत आहेत ! त्यामुळे हा अंधार पडला आहे ! मुक्ताबाई, संभ जळते, पण पीळ जळत नाहीं; त्याप्रमाणे असुर संपत्तीने या झालेल्या चांगदेवश्रेष्ठांच्या चित्तांत जरी अनुताप उत्पन्न झाला आहे, तरी त्यांच्या अंतःकरणांतील योगसिद्धीचा आभमान अद्याप पुरा जळला नाहीं । आणि ह्मणूनच आपल्या सिद्धीचा अद्भुत प्रभाव आपणा सर्वांना दाखविण्याकरितां ते आज वाघावर बसून आणि हातांत सर्पाचा चाबूक घेऊन आपल्या भेटीला येत आहेत ! सुक्ताबाई-दादा ज्ञानराया, तर मग आपण त्यांना सामोरे ! आणि अत्यंत आदरपूर्वक त्यांना आपल्या मठांत घेऊन घेऊ ! ह्मणजे त्यांच्या आगमनाने आपला आश्रम पुनीत होईल ! पण दादा आपल्यापाशीं वहन नाहीं, ते आपण कोठून आणावें ! आणि समर्थांच्या भेटीला आपण कशावर बसून जावे ! | ज्ञानेश्वर- मुक्ताबाई, वहनावरच बसून समर्थ चांगदेवांच्या भेटीला जावे असे तुझ्या मनांत असेल तर, श्रीपांडुरंगकृपेनें ही भिंतच आपले वहन होऊन आपल्याला मुनिश्रेष्ठांच्या भेटीला नेईल! निवृत्तिनाथ- ज्ञानदेवा, चला तर मग. या भिंतीवरच बसून आपण सिद्धांना सामोरे जाऊ ! ज्ञानेश्वर:- भिंतीबाई, श्रीनिवात्तनाथ सद्गुरूंची आज्ञा होत आहे, तर चला बाई ! आह्मांला आपल्या पाठीवर घेऊन योगीश्रेष्ठ चांगदेवांचे दर्शन आह्मांला करवा ! चला !