पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/107

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. ९७ ( असे ह्मणतांच भिंत चालू लागते. इतक्यांत वर वर्णन केल्याप्रमाणे वाघावर बसुन व हातांत सपचा चाबूक घेऊन श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या भेटीला अंतरिक्षांतून येत असलेले चांगदेव आपल्या शिष्यांसह भूतलावर उतरतात, तो श्रीज्ञानेश्वरादि अचेतन भिंतीवर बसून येत आहेत असे त्यांच्या दृष्टीस पडते. ) चांगदेव-( खजील होऊन, मनाशी ) अहाहा ! सद्गुरु समर्था ज्ञानदेवा ! धन्य ! धन्य आहां तुह्मी ! कीं आज भक्ति, ज्ञान, वैराग्य, कला बरोबर घेऊन, तुह्मा साक्षात् ब्रह्म पुतळे, आमच्या भेटीचा सोहळा करण्याकरितां, निर्जिव भिंतीला सचेतन करून तीवर बसून, आह्मांला सामोरे येत आहां ! सद्रुनाथा, काय ही आपली अघटित लीला ! श्रीकृष्ण परमात्म्याने जसा गोवर्धन पर्वत जेवविला, तशी आपण आज ही अवटित लीला करून दाखविली ! आणि अशा जगद्गुरूंना न ओळवून मी स्वतःची थोरवी दाखविण्याकरितां व्याघ्रावर बसून आणि हाती सपचा चाबूक घेऊन यांच्या भेटीला आलों ! तेव्हां धिक् ! धिक् माझे अज्ञान ! ( चांगदेव व्याघ्रावरून खाली उतरतात व हातांतील सपोचा चावूक टाकून देतात. सर्व व व्याघ्र निघून जातात. हे पाहून श्रीज्ञानेश्वरादि मंडळीही भिंतीस थांबवून तीवरून खाली उतरतात. चांगदेव व त्यांचे शिष्य श्रीज्ञानेश्वरादि मंडळीपुढे साष्टांग दंडवत घालतात. श्रीज्ञानेश्वरादि मंडळीही त्यांस उलट नमस्कार घालतात. ) ज्ञानेश्वर-(चांगदेवांस आलिंगन देऊन ) चांगदेवसिद्धांआहांतुह्मीथोर ॥ सर्वज्ञउदारआह्मांलागीं। ॥ १॥ भेदूनषट्चक्रेसाधिलेयामासी ॥ ऋद्धिसिद्धि दासीस्वयेंकेल्या ॥ २ ॥ चांगदेव- (गहिवरून ) संतांच्यादर्शनेशुद्धझालेमन ।। गेलाअभिमानविरोनियां ॥ १ ॥ काळवंचनेनेवांचविलेंशरीर ॥ पाहावेयोगीश्वरतुह्मांऐसे ॥ २॥ वटेश्वरचांगाकरीतविनंती ।। तोड़ा माझी गुंती संसाराची ॥ ३ ॥ अहो सकल शास्त्रविशारदा ज्ञानराया ! अहो सर्वसौख्यप्रदायका !